
परंडा शहरात न्यायालयासमोर उभ्या कारने अचानक घेतला पेट; वेळीच बॅटरीची वायर काढल्याने मोठा अनर्थ टळला…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा शहरात न्याया लय परिसरासमोर सकाळपासून पार्क केलेल्या एका चार चाकी कारला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
- ही कार पेट्रोल आणि सीएनजी (CNG) इंधनावर चालणा री असल्यामुळे मोठा स्फोट होण्याची भीती निर्माण झाली होती.

- मात्र, कार मालकाने दाखवलेल्या प्रचंड प्रसंगावधानाने पुढील मोठा अनर्थ टळला.

- मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी गाडी आज सकाळपासून न्यायालय परिसरासमोर उभी होती. दिवस भर उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याने गाडी कमालीची तापली होती.

- सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अतिउष्णतेमुळे गाडीच्या अंतर्गत वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि वायरिंगने पेट घेतला. गाडीतून धूर निघत असल्या चे पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली.

- गाडी पेट्रोल आणि सीएनजी किटने सज्ज असल्यामुळे आगीचा भडका उडाला असता तर मोठा स्फोट होण्याची शक्यता होती.

- मात्र, घटनेची माहिती मिळताच कार मालकाने जीवाची परवा न करता तात्काळ धाव घेतली आणि गाडीचा बॉनेट उघडून बॅटरीची वायर बाजूला केली.

- बॅटरीचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आणि पुढील अनर्थ टळला.

- या घटनेत गाडीच्या वायरिंगचे नुकसान झाले असून,कोण तीही जीवितहानी झाली नाही. वेळीच दाखवलेल्या या धा डसामुळे परंडा न्यायालय परिसराने सुटकेचा श्वास सोड ला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/





