
तानाजीराव सावंत फाउंडेशनतर्फे नळदुर्ग रामतीर्थ येथे पायी भाविकांना महाप्रसाद वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शारदीय नवरात्रौत्स व आणि आश्विन पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी आई तुळ जाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भा विक तुळजापूरकडे मार्गस्थ होत आहेत.
- महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतून पायी चा लत जाणाऱ्या हजारो भाविकांची रस्त्यात खाण्यापिण्या ची गैरसोय होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ.तानाजीराव सावंत फाउंडेशनच्या वतीने नळदुर्ग येथील रामतीर्थ देवस्थान परिसर येथे भव्य मोफत महाप्रसाद वाटप करण्यात आले.

- शिवसेनेचे जळकोट गावचे माजी सरपंच प्रशांत नवगिरे यांनी या उपक्रमाचे नेटके संयोजन केले होते.
- परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणा ऱ्या पदयात्री भाविकांची पायपीट लक्षात घेऊन, त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून फाउंडेशनतर्फे उपवासाचे विविध चविष्ट पदार्थ आणि ताज्या फळांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
- या स्तुत्य उपक्रमाचा प्रारंभ रामतीर्थ मंदिराचे पुजारी शु क्ला महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजनाने करण्यात आला.
- मार्गस्थ होणाऱ्या हजारो भाविकांनी या मोफत महाप्रसा दाचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला आणि सावंत फाउंडेश नच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
- हा अन्नदान सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ.सावंत फाउं डेशनचे वैभव स्वामी, धीरज ढोणे, आदित्य नवगिरे, नमन नवगिरे, महादेव धनशेट्टी, रोहन काळे यांच्यासह शिवसेने चे व फाउंडेशनचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- भाविकांच्या अखंड सेवेसाठी अहोरात्र राटणाऱ्या कार्यक र्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






