
खाकी मागचा माणूस: उन्हातान्हात रस्त्यावरच जेवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाचा फोटो व्हायरल; नागरिकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिसाचा (ट्रॅफिक पोलीस) भररस्त्यात उभे राहून किंवा कडेला बसून जेवण करतानाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
- फोटो पाहून सर्वसामान्यांच्या मनात हळहळ व्यक्त होत असली, तरी या निमित्ताने पोलीस दलाच्या कठीण काम गिरीचे आणि त्यांच्याप्रती असलेल्या समाजाच्या दृष्टिको नाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

- आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र सेवा
- वाहतूक पोलीस हे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळ गता रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजाव त असतात.
- अनेकदा कामाच्या अतिताणामुळे त्यांना वेळेवर जेवायला ही मिळत नाही. स्वतःचा संसाराचा गाडा, तसेच रक्तदाब (BP) आणि मधुमेह (Sugar) यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करून हे कर्मचारी नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी झटत असतात.
- ‘पैसे खाणारे’ ही प्रतिमा पुसण्याची वेळ
- दुर्दैवाने, अनेक नागरिक आणि प्रवाशांच्या मनात पोलिसां बद्दल गैरसमज आहेत. “पोलीस फक्त पैसे उकळण्यासा ठीच उभे असतात,” अशी टीका सर्रास केली जाते.
- मात्र, जो पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतो, तो जर पैसेच घेत असता तर त्याला भररस्त्यात, धुळीत उभे राहून कोरडा घास खाण्याची वेळ आली अस ती का? हा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांनी स्वतःला विचार ण्याची गरज आहे.
- पुढाऱ्यांचे फोन आणि हुज्जत नको, सहकार्य हवे!
- वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलिसांनी एखादी दुचाकी किंवा वाहन अडवले, तर अनेकजण पोलिसांशी उद्धटपणे बोलतात, हुज्जत घालतात किंवा थेट राजकीय पुढाऱ्यांना फोन लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.
- काहीजण तर पोलिसांना पाहताच गाडी पळवून नेण्याचा धोकादायक प्रयत्न करतात.
- नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन:
- सन्मान द्या: पोलीस हा देखील आपल्यासारखाच एक मा णूस आहे. तो केवळ आपला रक्षक आणि जनतेचा सेवक आहे, हे लक्षात ठेवून त्यांना योग्य तो मान-सन्मान द्या.
- पळून जाऊ नका: पोलिसांना पाहून घाबरून किंवा निय म मोडल्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे अपघात होऊ शकतो.
- खरे बोला आणि सहकार्य करा: गाडी अडवल्यास उद्ध ट न बोलता किंवा कोणाचाही फोन न लावता आपली खरी अडचण पोलिसांना सांगा आणि त्यांना सहकार्य करा.
- जर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतूक नियमांचे पा लन केले आणि पोलिसांना सहकार्य केले, तर पोलिसांव रील कामाचा ताण नक्कीच कमी होईल आणि या ‘खाकी’ वर्दीतील माणसाला पुन्हा कधीही रस्त्यावर जेवण्याची वेळ येणार नाही.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






