‘कॉमन मॅन’ला शिंदे-फडणवीस सरकारचं गिफ्ट; रुग्णालयात ५ लाखांपर्यंत उपचार मोफत
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- हायलाइट्स:
- आतापर्यंत नागरिकांना १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते
- ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे
- मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, अंगणवाडी सेविकांसाठी अनेक घोषणांची लयलूट केली.
- राज्यातील गरीब नागरिकांच्यादृष्टीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली.
- त्यानुसार सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
- आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते.
- ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय उपचारांसाठी सर्वस्वीपणे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असणाऱ्या गरीब आणि निम्न मध्यम वर्गीय नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.
- त्यामुळे एका आर्थिक वर्षात नागरिकांना रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतील.
- विशेष गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत २०० नवीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
- त्यामुळे सामान्य नागरिकांना उपचार घेण्यासाठीच्या रुग्णालयांच्या पर्यायांमध्ये वाढ झाली आहे.
- तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून चार लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
- याशिवाय, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु होणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.
- राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे.
- राज्यात १४ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.
- ठाणे आणि कोल्हापुरात अत्याधुनिक मनोरुग्णालये/ अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची तरतूद.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space