नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यातल्या 8 कोटी जनतेला 10 लाखांपर्यंत मोफत उपचार; देवेंद्र फडणवीसांची माहिती – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राज्यातल्या 8 कोटी जनतेला 10 लाखांपर्यंत मोफत उपचार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- राज्यातल्या 8 कोटी जनतेला 10 लाखांपर्यंत मोफत उपचार; देवेंद्र फडणवीसांची माहिती, योजना आहे तरी काय…..?
  • राज्यातल्या 8 कोटी जनतेला आता मोफत उपचार मिळणार आहेत, अशी माहिती सोमवारी उपमुख्य -मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
  • त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण नंतर सर्वात जास्त खर्च होतो तो आरोग्यावर.
  • त्यामुळे फडणवीस यांनी सांगितलेली नेमकी ही योजना आहे तरी काय, जाणून घेऊयात.
  • नेमकी योजना काय….?
  • अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 500 आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली होती.
  • त्या योजनेला मूर्त स्वरूप देत आज देवेंद्र फडणवीस यांनी 300 आपला दवाखान्याचे उद्घाटन केले.
  • यावेळी फडणीस म्हणाले की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एक चांगली योजना सुरू आहे.
  • या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळतो. तर पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून 5 लाखांचा उपचार मोफत मिळतो.
  • शस्त्रक्रियेत लाभ….
  • देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनांमधून 900 शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत मिळतील. त्याचा राज्यातल्या 12 कोटींपैकी तब्बल 8 कोटी लोकांना फायदा होईल.
  • किडनी प्रत्यारोपण साठीही 4 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आता आपला दवाखानातूनही अनेक सेवा मोफत मिळतील.
  • दवाखान्यात तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • निर्णय गतिमान….
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्पना मांडली. ती तानाजी सावंत यांनी पूर्णत्वास नेली.
  • महाविकास आघाडीचे सरकार असताना एक रुपयांत उपचार करण्याची घोषणा केली. मात्र, अडीच वर्षांत त्यांनी एकही दवाखाना सुरू केला नाही.
  • आम्ही 500 दवाखाने सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर दोनच महिन्यात 300 दवाखाने सुरू होत आहेत.
  • हीच गतिमान सरकारची पावती असल्याचे सांगाय -लाही ते विसरले नाहीत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा