वडिलांनी किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : राहूल आढाऊ :- आपल्या मुलांसाठी आईवडिलांची नेहमीच त्याग करण्याची वृत्ती असते. याचा अनुभव मंगळवारी (ता.९) एम्समध्ये आला.
- ३४ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी आपली किडनी दान केली. लेकराला नव्याने जीवनदान दिले.
- मध्य भारतात लाइव्ह ‘किडनी प्रत्यारोपणा’ ची यशस्वी शस्त्रक्रिया करणारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ही दुसरी शासकीय संस्था आहे.
- बालाघाट येथील ३४ वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. वर्षभरापासून तरुण डायलिसिसवर होता. त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले.
- दरम्यान आरोग्य विभागाकडून ‘एम्स’ला अवयव प्रत्यारोपणाची मंजूर मिळाली.
- ५७ वर्षीय वडिलांनी नेफ्रोलॉजी विभागात उपचार घेत असलेल्या मुलाला किडनी दान करण्यासाठी पुढाकार घेतला.
- त्यानुसार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमोल भवाने आणि डॉ.आनंद चेल्लापन यांच्यासह डॉ. चंद्रकांत मुंजे -वार, डॉ.नीलेश नागदेवे, डॉ. नीलकमल मेश्राम, डॉ. अमृषा रायपुरे, डॉ. बरखा अग्रवाल, डॉ. मोहन सुंदरम, डॉ.भुवनेश्वरी यांच्या पथकाने ही किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली.
- नातेवाइकांच्या परवानगीने विभागीय अवयवदान समितीचे अध्यक्ष तसेच यूरोलॉजिस्ट डॉ.संजय कोलते यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांच्या पथकाने प्रत्या- रोपणाची प्रक्रिया पूर्ण केली.
- मंगळवारचा योगायोग…
- मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीत ९ फेब्रुवारी २०१६ रोजी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात पहिले किडनी प्रत्यारोपण झाले होते.
- शासकीय संस्थेतील ते पहिले किडनी प्रत्यारोपण होते. तो दिवस मंगळवार होता.
- एम्समध्ये ९ मे २०२३ रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीगिरीवार यांच्याच मार्गदर्शनात किडनी प्रत्यारोपण झाले. ९ मे रोजी देखील मंगळवार आहे.
- दोन्ही शासकीय संस्थेत पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले तोही दिवस योगायोगाने मंगळवार होता.
- एम्स उपचारासोबतच संशोधन संस्था आहे. किडनी प्रत्यारोपणातून आता खऱ्या अर्थाने आरोग्याच्या विकासाला चालना मिळाली.
- एम्सचे संचालक डॉ. एम. हनुमंत राव यांच्या मार्गदर्शनात लाइव्ह किडनी प्रत्यारोपण झाले.
- येत्या काळात अवयवदानाच्या प्रचार व प्रचारासोबतच अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतील.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक,एम्स.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space