
पाचपिंपळा शिवारात शॉटसर्कीटने सात एकरवरील ऊसाचा फड जळून खाक.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा तालुक्यात अगो दरच अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
- त्यात परंडा तालुक्यातील पाचपिंपळा शिवारात शनिवारी (दि.११) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्टसक्रीट होऊन विद्युत पुरवठा करणारी तार तुटून ७ एकर ऊस जळून खाक झाला.
- यामध्ये दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

- पाचपिंपळा येथील शेतकरी बालाजी वसुदेव खैरे यांचे यां च्या गट नं १४०/२ मधील ऊसावर पडल्याने २६५ जाती चा साधारण ४ एकर ऊस जळाला असून याबरोबर शेजा रीच असलेल्या अंकुश महारुद्र खैरे यांच्या गट नं १४०/३ मधील ऊसाला आग लागल्याने त्यांचा जवळपास ३ एकर ऊस जळाला आहे.

- विद्युत वितरण कंपनीच्या गलथान पणामुळे आगोदर अ तिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

- अगोदरच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. या ऊसा ची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









