नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या 4 गोष्टी….. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या 4 गोष्टी…..

'कॅप्टनकूल' एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या 4 गोष्टी.........

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
 रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर :  धोनीने 23 डिसेंबर 2004ला बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो भारताकडून वनडेत पदार्पण करणारा 157वा खेळाडू ठरला होता.

साल 2004 पासून ते 2019 पर्यंत धोनीने भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने 2007 सालचा टी20 विश्वचषक आणि 2021 सालचा वनडे विश्वचषक जिंकला. तसेच, 2013 साली त्याने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकून दिली होती. धोनीची क्रिकेट कारकिर्द दमदार राहिली आहे. या लेखात, धोनीच्या आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेऊयात, ज्या तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील.

एमएस धोनीच्या आयुष्यातील चार माहित नसलेल्या गोष्टी (4 Unknown Facts About MS Dhoni) –

1. धोनीला आहे एक मोठा भाऊ –
धोनीचे वडील पान सिंग आणि आई देवकी देवी यांच्याविषयी सर्वांना माहिती आहे. दिग्दशर्क नीरज पांडे यांच्या ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे सर्वांना हे माहिती झाले की, धोनीला जयंती गुप्ता नावाची बहीण आहे. परंतु, खूप कमी जणांना हे माहिती आहे की, धोनीला एक मोठा भाऊदेखील आहे.

त्याच्या मोठ्या भावाचे नाव नरेंद्र सिंग आहे. तो राजकारणी नेता आहे. त्याने 2009 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, पक्षनेत्यांशी मतभेद झाल्याने त्याने पक्ष सोडला. पुढे 2013 मध्ये त्याने समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

2. धोनीच्या यष्टीरक्षण शैलीचा उदय –
धोनीच्या यष्टीरक्षणाची प्रशंसा जगभरात होते. पण, त्याच्या यष्टीरक्षण शैलीचा उदय फुटबॉलद्वारे झाला आहे. धोनीला लहानपणी फुटबॉल आणि बॅडमिंटन या खेळांची फार आवड होती. त्याने क्लब स्तरावर हे दोन्ही खेळ खेळले आहेत. धोनी हा फुटबॉल संघात गोलकिपिंग करत असायचा. त्याच्या फुटबॉल पकडण्याच्या शैलीने शालेय प्रशिक्षक केशव बॅनर्जींना प्रभावित केले होते. पुढे बॅनर्जींनीच धोनीला यष्टीरक्षण करण्यासाठी प्रेरित केले होते.

1994 साली धोनीने पहिल्यांदा शालेय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आणि पुढे 3 वर्षांच्या मेहनतीने त्याला फलंदाजी आणि यष्टीरक्षणात शालेय संघाचा हिरो बनवले.

3. धोनीच्या फेमस ‘हेलिकॉप्टर शॉट’चा शोध –
धोनीच्या खास ‘हेलिकॉप्टर शॉट’चे सर्वजण दिवाने आहेत. पण धोनीने या शॉटचा शोध लावलेला नाही. त्याला हा शॉट त्याच्या बालपणीचा मित्र संतोष लालने शिकवला आहे. संतोष या शॉटला ‘थप्पड शॉट’ असे म्हणायचा. त्याने धोनीला काही समोस्यांच्या बदल्यात हा शॉट शिकवला होता. संतोष आणि धोनीने एकत्र झारखंडकडून क्रिकेट खेळले होते.

4. एक नकोसा विक्रम केलाय नावावर –
धोनीने त्याच्या शानदार कारकिर्दीत नकोसा विक्रमही केला आहे. त्याने 2017च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. हे कोणत्या भारतीय फलंदाजाने केलेले दुसरे सर्वात धीम्यागतीचे अर्धशतक आहे. त्याच्यापुर्वी हा नकोसा विक्रम सदागोपन रमेश यांच्या नावावर आह                      सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/   

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा