नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रेम असावं तर असं! मेस्सीसाठी त्याच्या पत्नीने केला होता ‘हा’ त्याग, तुम्हालाही वाटेेल हेवा – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

प्रेम असावं तर असं! मेस्सीसाठी त्याच्या पत्नीने केला होता ‘हा’ त्याग, तुम्हालाही वाटेेल हेवा

प्रेम असावं तर असं! मेस्सीसाठी त्याच्या पत्नीने केला होता 'हा' त्याग, तुम्हालाही वाटेेल हेवा...... 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

                                               रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर :  लिओनल मेस्सी यानेफीफा विश्वचषक2022मध्ये आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या खेळाची जादू अशी पसरवली की सारे प्रेक्षक त्याचे चाहते झाले.

लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने फ्रान्सचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे मेस्सीची यावेळी खूप चर्चा होत आहे. मेस्सीचा चाहतावर्ग पूर्ण जगभरात पसरलेला आहे. मात्र, त्याची पत्नी देखील कोणत्या स्टारपेक्षा कमी नाहीये. त्याची पत्नी एंटोनेला रोकुजो एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो (Antonela Roccuzzo) हीने दंतवैद्यकशास्त्राचा (Dental) अभ्यास केला. मात्र, मेस्सीला आधार देण्यासाठी तिनेे शिक्षण सोडले आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी बार्सिलोना येथे स्थलांतरित झाली. अर्ध्यातच शिक्षण सोडल्याने ती डेंटिस्ट नाही होऊ शकली, पण तीने मॉडेेलिंग आपले नशीब आजमवले आणि ती त्यात यशस्वी देखील झाली.फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना संपल्यानंतर मेस्सी आणि त्याच्या पत्नीने जिंकलेल्या ट्रॉफीसोबत फोटोशूट देखील केला.

फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवाारी (दि. 18 डिसेंबर) कतारमध्ये खेळवला गेला. या अंतिम सामन्यात फ्रांन्स आणि अर्जेंटिना हे संघ समोरासमोर आले. या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा रोमहर्षक पराभव केला. सामना सुरु झाल्यावर लिओनल मेस्सीने 23 व्या मिनीटाला आपल्या संघासाठी पहिला गोल केला. त्यानंतर अर्जेंटिनासाठी एंडल डी मारिया याने दुसरा गोल केला, ज्यामध्ये मेस्सीनेे असिस्ट केले होते. जेव्हा सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला तेेव्हा 30 मिनीटांचा अधिकचा वेळ देेण्यात आला. त्यामध्ये मेस्सीने 108व्या मिनीटाला आपला दुसरा गोल केला. मात्र, फ्रांसच्या किलीयन एम्बाप्पे याने फ्रान्ससाठी तिसरा गोल करत पुन्हा सामना बरोबरीत आणला. हा सामना निकाली लावण्यासाठी पेनाल्टी शूटआऊटचा आधार घेण्यात आला. पेनाल्टी शूटआऊटमध्येही मेस्सीने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. शेवटी अर्जेंटिनाने शूटआऊट 4-2ने जिंकत विश्वचषकावर आपले नाव कोरले.(lionel Messi’s wife Antonela Roccuzzo sacrificed her medical education to support Messi).                                                                         सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/      

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा