नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय………. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय……….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर :  अर्जेंटिना संघाचा संघाच स्ट्रार फुटबॉलपटू आणि कर्णधार  मेस्सीने  रविवारी (18 डिसेंबर) त्याचे स्वप्न सत्यात उतरवले. मेस्सीने अर्जेंटिना संघासाठी 36 वर्षांनंतर फीफा विश्वचषक जिंकला.

विश्वचषकाचा अंतिम सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार, असे सांगितले गेले होते. मात्र, आता मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार नसल्याचे समोर येत आहे.

रविवारी कतरच्या लुसैल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघाने पेनल्टी शुटआउटमध्ये 4-2 असे मागे टाकले. अर्जेंटिना संघाचा हा इतिहासातील तिसरा विश्वचषक विजय ठरला आहे. यापूर्वी 1978 आणि 1986 साली पार पडलेल्या फीफा विश्वचषकाचे विजेतेपद अर्जेंटिना संघाने जिंकले होते. मेस्सीने वयाच्या 35 व्या वर्षी त्याच्या देशासाठी विश्वचषक जिंकला. रविवारी त्याने त्याचा 172 वा आंतरराष्ट्रीय आणि विश्वचषकातील शेवटचा सामना खेळला, असे सांगितले जात होते. मेस्सीने स्वतः देखील याविषयी आधीच माहिती दिल होती की, 2022 विश्वचषकातील अंतिम सामना त्याचा शेवटचाच सामना असेल. मेस्सी म्हटला होता की, “मला खूप चांगलं वाटत आहे की, मी संघाला इथपर्यंत पोहोचवू शकलो. विश्वचषकातील माझा प्रवास अंतिम सामन्यात पूर्ण करेल.”

मात्र, वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार मेस्सी म्हणाला आहे की, मी ही ट्रॉफी अर्जेंटिनाला घेऊन जाऊ इच्छितो आणि इतर सर्वांसोबत त्याचा आनंद साजरा करेल. मी अजून विश्वचषक विजेत्या संघाच्या रूपात खेळायचे आहे. रविवारी अर्जेंटिनाला मिळालेल्या विजयात मेस्सीचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. त्याने संघासाठी दोन महत्वपूर्ण गोल दागले.

अर्जेंटिनाने फ्रांसला 4-2ने केले पराभूत
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मर्यादित 90 मिनिटांच्या खेळात सामना निकाली निघाला नाही. दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीवर होते आणि त्यानंतर पंचांना वेळ वाढवून दिला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतर मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला 3-2 अशी घाडी मिळवून दिला. पण काहीच वेळात किलियन एम्बाप्पेने संघासाठी सलग तिसरा गोल करत सामना 3-3 अशा बोरबोरीवर आणला. त्यानंतर पेनल्टी शुटआउटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. (Lionel Messi was supposed to retire after the final of FifaWC2022, but he changed his mind after winning the World Cup)                                                                                                                             सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा