नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , FIFA World Cup 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ……… – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

FIFA World Cup 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ………

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर :  FIFA World Cup 2022  या स्पर्धेत अनेक सामन्यांमध्ये उलटफेर दिसले. त्यातील एकच सामना ज्यामध्ये मोरोक्कोने पोर्तुगलला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आणि पोर्तुगल स्पर्धेबाहेर झाला. याच सामन्यात स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याला बाकावर बसवले गेले. ज्यामुळे चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आणि मुख्य प्रशिक्षक पदाच्या राजीनाम्याची मागणी केली. जी गुरूवारी (15 डिसेंबर) पूर्ण झाली.

फर्नांडो सॅंटोस (Fernando Santos) यांनी पोर्तुगलच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. पोर्तुगलने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून याची माहिती दिली. 68 वर्षीय सॅंटोस यांनी 2014पासून पोर्तुगलच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्विकारली.

मोरोक्कोकडून 1-0 असा पराभव झाल्याने चाहते खूपच निराश झाले होते. तसेच सॅंटोस हे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यांनी विश्वचषकात रोनाल्डोला बाकावर बसवून चूक केली हे मान्य केली. पदाचा त्याग केल्यानंतर सॅंटोस म्हणाले, “माझ्या निर्णयामुळे कोणीही खूष नव्हते, पण तुम्हाला वेळप्रसंगी कठीण निर्णय घ्यावेच लागतात. पोर्तुगलचे मुख्य प्रशिक्षक पद भुषविणे स्वप्नसारखे होते आणि ते पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. ”

 

 

सॅंटोस यांनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 109 सामन्यांमध्ये पोर्तुगलचे प्रशिक्षकपद भुषविले. ज्यामध्ये संघाने 226 गोल केले आणि 67 सामने जिंकले. यादरम्यान संघाने 2 चषकही जिंकले. त्यामुळे ते पोर्तुगलच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे पहिलेच प्रशिक्षक ठरले. त्यांच्या प्रशिक्षकादरम्यान संघाने 2016मध्ये युरो चषक आणि 2019मध्ये युईएफए नेशन लीग जिंकली.

कतारचा विश्वचषक रोनाल्डोच्या कारकिर्दीचा शेवटचा विश्वचषक मानला जात होता. त्यातच अतिमहत्वाच्या सामन्यात त्याला बाकावर बसवल्याने चाहतेही नाराज झाले होते.   तो एक निर्णय चुकल्याने सॅंटोस यांच्यावर टीका झाली. आता त्यांनी राजीनामा दिल्याने मुख्य प्रशिक्षक पद रिक्त झाले आहेत. त्यावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.                                                     सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा