नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोराचा नाद पूर्ण करण्यासाठी ‌अंबानी घेणार अब्जावधींचा फुटबॉल क्लब विकत. ? इंग्लंडमध्ये बसवणार बस्तान………. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पोराचा नाद पूर्ण करण्यासाठी ‌अंबानी घेणार अब्जावधींचा फुटबॉल क्लब विकत. ? इंग्लंडमध्ये बसवणार बस्तान……….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर :  भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी आता क्रिकेटपाठोपाठ आपला मोर्चा फुटबॉलकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी ते इंग्लंडमधील प्रतिष्ठित लिव्हरपूल फुटबॉल क्लब खरेदी करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता ती चर्चा मागे पडली असून,‌ इंग्लंडमधीलच दुसरा एक ताकदवान संघ आर्सेनल फुटबॉल क्लब घेण्यासाठी ते इच्छुक असल्याचे सांगितले जातेय. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आकाश हा या क्लबचा मोठा चाहता आहे.

जगातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी लिव्हरपूल क्लब खरेदी करणार अशी चर्चा जोरात सुरू होती. मात्र, काही कारणास्तव हा सौदा झाला नसल्याचे सांगितले जाते. तसेच, मँचेस्टर युनायटेडचे मालक असलेल्या ग्लेझर्स कुटुंबाचे समभाग अंबानी हे घेणार असल्याचे देखील वृत्त समोर आलेले.‌ मात्र, आता या सर्व शक्यता मागे पडल्या आहेत.

उत्तर इंग्लंडमधील आर्सेनल फुटबॉल क्लबचे सहसंघमालक असलेले क्रोएन्को स्पोर्ट्स अँड इंटरटेनमेंट ही कंपनी आपले समभाग विकत आहे. त्यामुळे तब्बल 280 कोटी इतक्या किमतीचे हे समभाग अंबानी घेऊ शकतात. मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आकाश हे या फुटबॉल क्लबचे मोठे चाहते असून, त्यांनीच यासाठी जंग जंग पछाडल्याचे सांगितले गेले.‌ हा करार पूर्णत्वास गेल्यास, वेंकीज समूहानंतर मोठा इंग्लिश फुटबॉल क्लब खरेदी करणारे अंबानी दुसरे भारतीय ठरतील. पोल्ट्री व्यवसायातील मोठे नाव असलेल्या व्यक्ती समूहाने 2010 मध्ये ब्लॅकबर्न रोव्हर्स संघ खरेदी केलेला.

अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, युएईतील एमआय एमिरेट्स व दक्षिण आफ्रिकेतील एमआय केपटाऊन या संघाची मालकी आहे. तसेच एमआयजी रिलायन्स हे भारतातील सर्वात मोठी फुटबॉल लीग असलेल्या इंडियन सुपर लीगचे आयोजन करतात.

( Now Mukesh Ambani Showing Interest In Own Arsenal Football Football Club)        सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/                                                                                                                                   

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा