राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ ; रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.
  • सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आ युक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली.
  • शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.
  • शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फु के, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहि ती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles