
कोकण कट्टा माणूसकीच्या भिक्षा फेरीतून विरार येथील साई आधार संस्थेला मदत.
- प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- कोकण कट्टा विलेपा र्ले तर्फे यंदा ९ व्या वर्षी ही माणुसकीची भिक्षाफेरीतून सा ईधार या संस्थेला २००० किलो तांदूळ व डाळ अशी संकलन केलेली मदत करण्यात आली.

- श्री.स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. बालग्राम पनवेल व सह्याद्री संस्था देवबांध येथे ही अन्नधान्य देण्यात येणार आहेच.
- साई आधार ही निराधार मुलांना घरपण देणारी संस्था आ हे. विशाल परुळेकर यांच्या या आश्रमात जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली.
- कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे, मार्गदर्शक जगन्ना थ गावडे, खजिनदार सुजित कदम, विवेक वैद्य, प्रथमेश पवार, प्रभाकर खेडेकर, मनिष माईन, निशी मोरे, सचिन माने, अथर्व मुरमुरे उपस्थित होते.

- उदय कौलकर यांनी मुलांना पेन तर रवी तांबे यांनी मुलां ना सकाळचा अल्पोपाहार व संजय कदम यांनी केक भेट दिली होती.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











