गीतकार भारत कवितके यांचे ‘ चांदण्याना रोज सांगतो’ गाणे युट्यूबवर प्रसारित.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कांदिवली पश्चिम येथी ल जेष्ठ पत्रकार, गीतकार, साहित्यिक, आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचे ‘चांदण्याना रोज सांगतो’ हे प्रेमगीत युट्यूबवर नुकतेच प्रसारित झाले आहे.
  • “चांदण्याना रोज सांगतो, आपुली कहाणी” पक्षांना रोज विचारतो, ठाव तुझा राणी.” हे गीत पीपी म्युझिक समुहाने प्रसारित केले असून त्याचे निर्माते श्रीराम घडे आहेत.
  • संवेदनशील मनाचे गीतकार भारत कवितके यांनी मनाला भुरळ पाडणारी शब्द रचना लिहीली आहे.
  • तर गायक विकास साळवे यांनी स्वरात जादू भरून स्वर साज सजविला आहे, मनपसंत, ओढून ताणून न आलेली सहज सुंदर चालीत गायले आहे.
  • तर सुप्रसिद्ध संगीतकार चंदन कांबळे यांनी मनाला विरंगु ळा देणारे संगीत दिलेले आहे.एकंदरीत “चांदण्याना रोज सांगतो” हे भारत कवितके यांचे गीत श्रवणीय झाले.
  • असल्याचा अनुभव गाणे ऐकताना येईल.कवी या गाण्यात सांगतो की,” माझे सगळे आयुष्य हे तुझ्या ( प्रियेसीच्या) आठवणीतच गेले.
  • पूर्वी प्रेमात पडून झालेली जखम अजून ओली असल्याने सतावते आहे. सलते आहे. तू कुठे तरी भेटशील ही ओढ चालताना पावला पावलावर दाटते. पूर्वी तुझ्या शब्दा श ब्दावर ठेवलेला विश्वास अजून ही तसाच आहे.
  • मी माझ्या जीवनात कधीच रमलो नाही, “आठवणी सांग ताना पुढे कवी म्हणतो,”तू भांडून भांडून माझ्याशी अबोला धरायची पण नंतर लगेच शर्त न घालता माफी मागायची, कधी रुसायची, कधी फुगायची पण हे तुझे सर्व खोटे खोटे लाख बहाणे असायचे हे मला माहीत होते.
  • आता मात्र माझ्या ओठी तुझीच उदास उदास गाणी आहे त, त्या काळात माझे मन तुझ्या साठी अगदी वेडावलेले होते, तेव्हाचे ते क्षण क्षण हरवल्यासारखे असायचे.
  • ते मंतरलेले दिवस मला मोहित करीत होते,पण ते सगळे मला मृगजळासारखे फसवे फसवे वाटतात.तुला आठवते का आपण तेव्हा राजा राणीचे खेळ खेळायचो,मी राजा आणि तूं राणी व्हायची.
  • पण काय करणार ही माझी कहाणी, शोकांतिका मी रोज चांदण्याना सांगतो, आणि दिवस भर सर्वत्र फिरणाऱ्या पक्षांना तुझा पत्ता म्हणजे ठाव ठिकाणा विचारत असतो,
  • पण अजून पर्यंत तरी निराशाच पदरी पडत आहे,”असे प्रियकराचे संवेदनशील, हळवे मनाचे कप्पे या गीतांमधून गीतकार भारत कवितके यांनी उघडून दाखविले आहेत,हे गाणे रसिकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल व प्रचंड प्रतिसा द मिळेल यात शंका नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles