नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गॅसमुळे पोट फुगतं, जेवणही जात नाही? 5 पदार्थ खा, कॉन्स्टिपेशन पोटाचे आजार राहतील लांब……… – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

गॅसमुळे पोट फुगतं, जेवणही जात नाही? 5 पदार्थ खा, कॉन्स्टिपेशन पोटाचे आजार राहतील लांब………

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर  : पोट फुगणं ही खूपच कॉमन समस्या झाली आहे. जास्त जेवणं झालं, बाहेरचं खाल्लं किंवा खाण्यात बदल झाला की असा त्रास जाणवतो. पोट फुगण्याबरोबरच पोटदुखीसुद्धा जाणवते. गॅसच्या त्रासापासून वाचण्यासाठी आहारतज्ज्ञ मनप्रीत बत्रा यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.

हे उपाय करून पोट फुगण्याचा त्रास टाळता येऊ शकतो (Home remedies to relieve stomach bloating and gas instantly) थंडीच्या दिवसात व्यवस्थित पोट साफ होत नसेल तरी तुम्हाला हे उपाय फायदेशीर ठरु शकतात.

जेवण व्यवस्थित चावून खा

आहार तज्ज्ञाच्यामते अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते. पूर्ण पोषण मिळतं. पोट फुगण्याचा त्रास दूर राहतो.

जेवणाच्या ३० मिनिटं आधी लिंबू पाणी घ्या

लिंबू पोटासाठी खूप चांगला आहे. म्हणूनच जेवण करण्यापूर्वी ३० मिनिटे लिंबू पाणी प्यावे. लिंबू पाणी तुमची पचनसंस्था शांत करून पीएच पातळी संतुलित करते.

दही आणि पुदीना

दुपारच्या जेवणात काही पुदिन्याची पाने दह्यात मिसळून खा. हा उपाय तुमच्या पोटातील पाचक एंजाइम सक्रिय करतो आणि पचन सुधारतो.                                                                                                                                                                                                                                                                                                                                              शरीरातले विषारी घटक बाहेर काढतात ५ पदार्थ; रोज खाल्ले तर होईल बॉडी डिटॉक्स

हिंग

काही डाळींचे सेवन केल्याने पोट फुगण्याची तक्रार होऊ शकते. हे टाळण्यासाठी डाळीत चिमूटभर हिंग घाला. हिंगामुळे पचनशक्ती वाढते, त्यामुळे अन्न लवकर पचते आणि पोट फुगणं जाणवत नाही

झोपताना गुलकंद खा

रात्री झोपण्याआधी गुलकंद दूधाचे सेवन करा. या घरगुती उपायानं पचनक्रिया व्यवस्थित राहते आमि पीएच लेव्हलसुद्धा संतुलित राहते.                                                                                               सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/ 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा