
हळदी समारंभात गीतकार नितीन लोखंडे यांच्या “अहो….यजमानी” गीताची धूम.
- प्रतिनिधी : दापोली : प्रमोद तरळ :- लग्न समारंभ म्हट ला की ताशे वाजंत्री यांचा कडकडाट, वधू-वरांच्या आयु ष्यातील अनमोल क्षण आपला लग्न सोहळा अविस्मरणी य ठरावा लग्नाचे भावनिक क्षण, पारंपरिक रितीरिवाज, मं गलमय वातावरण, आपल्या जोडीदारा सोबत घेतलेले सात फेरे आदी अनेक रुढी परंपरा आपल्या ह्रदयाच्या कप्प्यात कायमचे साठवून ठेवतो.
- आजही कोकणात लग्न सोहळे पारंपरिक रितीरिवाजा नुसार पार पडतात यामध्ये अलिकडे हळदी कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
- हळदीच्या गंधाळलेल्या प्रत्येक क्षणाला रंगीत करण्यासा ठी दापोली तालुक्यातील कोळबांद्रे गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध गीतकार, शाहीर नितीन लोखंडे यांच्या सुमधुर दिलखुलास आवाजात नवं करकरीत “अहो…
- यजमानी” हे गीत लग्नाच्या आनंददायी वातावरणात आ णि सध्याच्या काळातील वस्तुस्थिती सांगणारे हे गाणं रसिकांच्या भेटीला आले आहे.
- कोकणी कलाप्रेमी प्रस्तुत गीतकार आणि शाहीर नितीन लोखंडे यांचे हे गीत लग्न प्रेमींना नक्कीच भुरळ पाडेल गी ताचे संगीत संयोजक अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ, भांडुप असून कोरस नितेश लोखंडे, सचिन लोखंडे,राजेश लोखं डे,मयूर कदम,विशाल डाऊल यांचें आहे तर गणेश दवंडे, प्रशांत लाखण, चेतन सावंत, ह्रतिक लोखंडे व जितेंद्र लो खंडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
- लग्नाच्या आनंददायी वातावरणात “अहो..यजमानी” हे गीत निर्भेळ आनंद देणारे ठरेल हे गीत सर्वांनी आवर्जून ऐकावे असे आवाहन गायक नितीन लोखंडे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/