
गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांची हिमालयात 11,000 फुट उंच हिमशिखरांवर चढाई.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- श्री.दादा महाराज नाटेक र पंचकोषाधारीत विद्यालय चिखलीचे दुसरी ते नववीचे 40 विद्यार्थी व 5 अध्यापकांनी हिमालय पर्वतातील बिया स कुंड येथे ११,००० फुटां पर्यंत बर्फावरून ट्रेकिंग करत यशस्वी चढाई केली.
- या कामगिरीसाठी पालक वर्गातून कौतुकाची थाप विद्या र्थ्यांना मिळाली आहे.

- आइसलँड एडवेंचरचे गिर्यारोहक श्री.मुकुंद देवधर आणि श्री.राजेश गाडगीळ यांनी दिनांक 18 ते 28 एप्रिल 2025 यादरम्यान या कॅम्पचे आयोजन हिमाचल प्रदेश राज्याती ल मनाली येथील सोलंग व्हॅली येथे केले होते.
- या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी धुंदीताच, बखरताच, बियास कुं ड येथे ट्रेकिंग केले, तसेच रॉक क्लाइंबिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंगचे देखील प्रशिक्षण घेतले.

- या कॅम्पमध्ये ज्येष्ठ गिर्यारोहक डी.एस.गुलिया, एव्हरेस्टवी र राजीव शर्मा,महावीर ठाकूर, घनश्याम ठाकूर यांचा व्यक्ती परिचय झाला.
- त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.ऑलम्पिक स्किईग खेळाडू तनुजा ठाकूर हिनेदेखील मुलांशी संवाद साधला. ट्रेकिंग गाईड म्हणून श्री सचिन सर,श्री विजय सर,व ईशा ठाकूर यांनी काम पाहिले.

- या मोहिमेत सर्वात लहान वयाचे परम सूर्यवंशी(8वर्ष) व काव्य सीयेकर(9 वर्ष) तर सर्वाधिक जेष्ठ 70 च्या पुढचे श्री यशवंत लिमये,भारती मराठे व अन्य 11 सदस्य सहभा गी झाले होते.
- परतीच्या मार्गावर दिल्ली येथील महात्मा गांधींच्या समा धीचे राजघाट येथे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले.
- तसेच इंडिया गेट, कुतुब मिनार, संसद भवन, राष्ट्रपती भव न,लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूंना देखील भेट दिली.
- शाळेचे डॉ.तेजस प्रज्ञा यशवंत, श्री.वीरेंद्र सूर्यवंशी,सौ आर ती कोरे,सौ संध्या सातपुते व मुख्याध्यापक श्री.गौतम इंग ळे हे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.
- पालक समितीद्वारे सर्व हिमालयवीरांचे आइसलँड ऍडव्हे चर बॅच ट्रॉफी,प्रमाणपत्र ,हिमालयाची प्रतिमा, हिमाचल टोपी भेट देऊन सत्कार करण्यात आला.
- रंगकर्मी संजय गोसावी ,मृणाल गोसावी,गौरी शिकारपूर ,प्रशांत भोंडे प्रिया घोटणकर, डॉ.वैशाली जोशी व प्रज्ञा पिसोळकर यांनी मुलांचे कौतुक केले.

- कार्यक्रमामध्ये अनुभव कथन डॉ. तेजस लिमये,तर मुकुंद देवधर,राजेश गाडगीळ व यशवंत लिमये यांनी मार्गदर्शन केले.पालक दत्तात्रय बनकर, सौ.सुतार यांनी मनोगत व्य क्त केले केले.
- प्रास्ताविक वैशाली नरवडे व आभार प्रदर्शन गौतम इंगळे आणि सूत्रसंचालन साधना खुळे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











