खासदार रविंद्र वायकर यांची ’सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ ची मागणी.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेच्या संवर्धन व वृद्धीगतासाठी ‘सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची स्थापना करण्याची खासदार रविंद्र वायकर यांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित विभागाकडे पाठवला आहे.
  • तसे त्यांनी पत्राद्वारे खासदार यांना कळवले आहे. तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्यावेळी केंद्र सरकारने ‘सेन्ट्रल इंस्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ’‌ ची स्थापना केली.
  • यामुळे तमिळ साहित्य, प्राचीन ग्रंथाचा अनुवाद, संशोधन याच बरोबर शिक्षणाच्या वृद्धिंगतासाठी अनेक साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली.
  • याच धर्तीवर मुंबईत ‘सेन्ट्रल युनिव्हर्सिटी फॉर मराठी स्ट डीज’ ची स्थापना करण्यात यावी, अशी आग्रही मागणी २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी केली होती.
  • भारतात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा असून जिचा ८.३ कोटी जनता दैनंदिन जीवनात वापर करते. महाराष्ट्रात १२ हजार पेक्षा जास्त मराठी ग्रंथालय आहेत.
  • परंतु या भाषेच्या संवर्धन व संशोधनासाठी अद्याप एकही केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली नाही.
  • केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  दि ल्याने मराठी साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषिक जन तेसाठी निश्चितच आभिमानाची बाब असून हा ऐतिहासि क निर्णय आहे.
  • सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीजमुळे मराठी भाषे च्या संवर्धन, संरक्षण, संशोधन तसेच उच्च शिक्षणात राष्ट्री य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमीकरण सोईचे होणार असल्याचे आपल्या भाषणात नमूद करत सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीजची स्थापना करण्यात यावी.
  • अशी मागणी खासदार वायकर यांनी लोकसभेत केली होती तसे पत्रही त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री यांना पाठवले होते.
  • याची दखल केंद्राने खासदार वायकर यांचे हे पत्र संबंधित विभागाकडे पाठवले असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles