परंडा एसटी आगाराचा भोंगळ कारभार; बसफेऱ्यांच्या अनियमितेमुळे प्रवासी अन् रुग्नाचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-परंडा राज्य परिवहन महामं डळाच्या (एसटी) आगाराचा कारभार सध्या पूर्णपणे कोल मडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
  • बसगाड्यांच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे मो ठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
  • आगाराच्या या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
  • बार्शी मार्गावर प्रवाशांची कोंडी
  • मिळालेल्या माहितीनुसार, परंडा ते बार्शी या महत्त्वाच्या मार्गावर बसच्या वेळेचे कोणतेही नियोजन उरलेले नाही.
  • सकाळी १० वाजेनंतर थेट दुपारी १ वाजेपर्यंत एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
  • बार्शी हे शिक्षणाचे आणि व्यापाराचे केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
  • मात्र, दुपारी तीन-तीन तास बस नसल्याने प्रवाशांना खाज गी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, आर्थिक लूट सोसावी लागत आहे.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
  • ग्रामीण भागातून परंडा ते बार्शी येथे शिक्षणासाठी व उप चारासाठी जाणाऱ्या नागरीक व विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
  • सकाळी वेळेवर बस न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तास बुडत आहेत.
  • तसेच सायंकाळी घरी परततानाही बसची खात्री नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. “आम्ही पासचे पैसे भरूनही आम्हाला वेळेवर बस मिळत नाही, मग या पास चा उपयोग काय?” असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.
  • प्रशासनाकडून दुर्लक्ष
  • या संदर्भात प्रवाशांनी अनेकदा आगार प्रमुखांकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. बसगाड्यांचे वेळापत्रक कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे.
  • जर तातडीने या मार्गावरील बस फेऱ्या नियमित चालू कराव्यात.
  • परंडा आगाराने बार्शी मार्गासह इतर ग्रामीण भागातील ब स फेऱ्यांचे नियोजन त्वरित सुधारावे आणि प्रवाशांची होणारी ही गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरीकातून होत आहे .
  • ( परंडा बस डेपूच्या गाड्या वेळेवर फेऱ्या करीत नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जेष्ट नागरि कांना भूरंदड सोसावा लागत आहे. आयूब मुबारक जिनेरी )
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/I’ll

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles