वसई-विरार महानगरपालिकेत माहिती अधिकाराचा गंभीर भंग; अर्ज गहाळ करून माहिती लपवल्याचा संशय.

  • प्रतिनिधी : अनंत पाटील :- विरार, 14 मे 2025: वसई-विरार महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्र श्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दाखल के लेला अर्ज गहाळ करून माहिती लपवण्याचा गंभीर प्रका र समोर आला आहे.
  • स्थानिक रहिवासी अनंत पाटील यांनी पालिकेच्या सार्व जनिक माहिती अधिकाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला असून, मा. आयुक्तांवरदेखील निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे.
  • अनंत पाटील यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रभाग स मिती सी येथे, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंत र्गत अर्ज दाखल केला होता.
  • कायद्यानुसार 30 दिवसांत माहिती देणे बंधनकारक अस ताना, 80 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.
  • इतकेच नव्हे, तर त्यांचा अर्जच गहाळ झाला किंवा परस्प र विल्हेवाट लावला गेला, असा संशय पाटील यांनी व्यक्त केला आहे.
  • “माहिती लपवण्याच्या हेतूने हा जाणीवपूर्वक कृत्य आहे. पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि प्रामाणिक पणाचा पूर्ण अभाव आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
  • या प्रकरणी पाटील यांनी मा. आयुक्त, वसई-विरार महान गरपालिका यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
  • त्यांनी मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी दि रंगाई व कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभं गाची कारवाई करून सेवापुस्तिकेत नोंद करावी.
  • तसेच, अर्ज गहाळ किंवा विल्हेवाट लावल्याची कसून चौकशी करून तो शोधून माहिती तात्काळ पुरवण्याचे आदेश द्यावेत.
  • “आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे अधिनस्त अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिला नाही. आयुक्तच अशा गैरप्रका रांना खतपाणी घालत आहेत का, असा संशय निर्माण होतो,” असे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
  • या प्रकरणामुळे पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
  • “सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांच्या या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळी त झाला आहे,” असे पाटील यांनी ठणकावले.
  • त्यांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी माहिती आयोगा कडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे. वसई-विरार महा नगरपालिकेच्या या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
  • माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आ णि प्रशासनाची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी मा. आयुक्त काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles