
राजवाडी – मोगरे पंचक्रोशी प्रिमियर लिग (RMPL) उस्फुर्त प्रतिसादात संपन्न.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यात दि. १३ मे २०२५ रोजी, कांगापूर मळा येथे, आयोजीत केलेली राजवाडी – मोगरे पंचक्रोशी प्रीमियर लीग अगदी यशस्वी रित्या व आनंदात पार पडली.
- पहिल्याच वर्षी RMPL च्या विजेत्या चषकाचे मानकरी इरा – शिवांश इलेव्हन ( वाडापाणेरे/गाऊडवाडी )ठरलेले आहेत.
- या संघाचे संघमालक श्री किरण वारीशे व श्री दिपेश बंडबे व त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
- तसेच यावर्षीचे उपविजेत्या चषकाचे मानकरी ठरलेला गजानन इलेव्हन संघ आणि संघमालक श्री सुबोध वाघरे व त्यांच्या सर्व खेळाडूंचेही अभिनंदन करण्यात आले.
- स्पर्धेतील विशेष मानकरी ठरलेले मालिकावीर – कु. तुषार शृंगारे, उत्कृष्ट फलंदाज – कु.प्रतीक शेमणकर, उत्कृष्ट गो लंदाज – श्री.किरण वारीशे, सिक्सर किंग – कु.अभिषेक लाड उगवता तारा – कु. तन्मय जाधव या सर्वांचे अभिनंद न करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
- तसेच स्पर्धेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या मोलाचे सहकार्य केले त्याशिवाय देणगीदारांचे विशेष आभार.. मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/