
अकोला बाजार येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2.अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खड्ड्यांचे उद्घाटन.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत दृश्यमान व शाश्वत स्वच्छ तेसाठी राबविण्यात येणाऱ्या “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ करू”या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अकोला बाजार येथे शुक्रवार दिनांक ९ मे रोजी सकाळी अकरा वाजता घनकचरा व्यवस्थापन खड्ड्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

- सदर खड्डे हे अकोला बाजार येथील मोक्षधामजवळ उभा रण्यात आले असून ग्रामपंचायतस्तरावर घनकचरा व्यव स्थापनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
- गावातील सर्व कचरा गोळा करून घनकचरा खड्ड्याच्या ठिकाणी आणून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

- या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती गट विकास अधिकारी किशोर गोळे, ग्रामपंचायत सरपंच योगेश राजूरकर, ग्राम विकास अधिकारी सुनील भाकरे, जि.प.स्वच्छता मिशनचे गुल्हाने, पंचायत समिती यवतमाळ एस.बी.एम विभागाचे पल्लवी पाटील,ढवळे मॅडम तसेच अकोला बाजार येथील स्वच्छता दूत गजानन घुले,संगीता राठोड, संदीप भगत, म हेश मडावी, ऋचिता कोडापे,वंदना मेश्राम,वृषाली आरके हे उपस्थित होते.

- स्वच्छतेच्या या उपक्रमासाठी वरील सर्व मान्यवरांनी मेह नत घेतली असून,त्यांच्या कार्याची प्रशंसा करत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांनी या उपक्रमाला “स्वच्छतेचा वसा” म्हणून गौरविले.

- यावेळी मोक्षधामच्या उन्नतीसाठी सतत झटणारे मनोज मिश्रा, ग्रामपंचायत कर्मचारी वृषभ टेकाम,सचिन कोयरे, अक्षय शेंद्रे,भोला खंडारे,श्रावण गजबे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर पंच, गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे स्वच्छता दूतांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

- तसेच स्वच्छतादूत यांनी समस्त नागरिकांना आवाहन के ले की, आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा जमा करून ग्राम पंचायत स्वच्छता कर्मचारीच्या मार्फत आम च्या पर्यन्त पोहोचावा जेणे करून आपले पूर्ण स्वच्छ होऊ न कचर्याची योग्य विल्हेवाट करता येईल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











