
झेप प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या कर्जतच्या “भिमाद्री विद्यालयाचा १० वीचा १००%” निकाल.
- प्रतिनिधी : कर्जत : प्रमोद तरळ :- दुर्गम भागातील शि क्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या झेप प्रतिष्ठान च्या प्रयत्नांना मोठे यश लाभले आहे.
- झेप प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या कर्जत तालुक्यातील भि माद्री विद्यालय शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून, संपूर्ण परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी यशस्वी का मगिरी करत शाळेच्या यशात भर घातली आहे.

- झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी दिलेल्या मा हितीनुसार,संस्थेने या शाळेची दत्तक योजना स्वीकारल्या पासून केवळ शैक्षणिकच नव्हे तर भौतिक पातळीवरही मोठे परिवर्तन घडवून आणले आहे.
- शाळेत मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित शौचालय,आधुनि क प्रयोगशाळा,सुसज्ज वर्ग, लायब्ररी,सौरऊर्जा पॅनल, सी. सी.टी.व्ही प्रणाली,तसेच वह्या, पुस्तके, दफ्तर,पेन, गाईड व इतर शैक्षणिक साहित्य मुलांना मोफत पुरवण्यात आले.
- विशेष म्हणजे,सर्व मुलांना शाळेचा गणवेश दिला गेला अ सून मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स आणि अत्याधुनिक वेडिं ग मशीन शाळेत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- शाळेच्या भिंतींना नव्या रंगरंगोटीने सजवले गेले असून ११ संगणक,प्रिंटर व इतर डिजिटल सुसज्जता शाळेला बहाल करण्यात आली आहे.
- या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि अ भ्यासातही त्यांचा रस वाढला. गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व भौतिक वातावरण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्ष कांनी जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर हा निकाल गाठला.
- केवळ निकालच नव्हे तर ही यशोगाथा झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
- या पुढील टप्प्यात संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना करिअर मा र्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी,तसेच विविध क्षेत्रातील संधीं बाबत माहिती देण्याची योजना आखण्यात आली आहे.
- झेप प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्या र्थ्यांनाही उज्वल भवितव्याची दारे खुली झाली आहेत.
- शाळेचे शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनी झेप प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या योगदानाचे वि शेष कौतुक केले.
- “शिक्षण हीच खरी शक्ती आहे” हे ध्येय बाळगून झेप प्रति ष्ठान ज्या प्रकारे दुर्गम भागात कार्यरत आहे, ते निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











