गडहिंग्लज वनपरिक्षेत्रात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश – वनपाल सागर यादव ₹5000 लाच घेताना ए.सी.बी च्या जाळ्यात.

  • प्रतिनिधी : अनंत पाटील :- आजरा तालुक्यातील राज्य हद्द रस्ता क्र. 63 च्या रुंदीकरणाच्या कामात झाडांच्या लि लाव प्रक्रियेसाठी अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तीकडून ₹6000 लाचेची मागणी करणाऱ्या वनपाल सागर पांडुरंग यादव (वय 43) याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ₹5000 लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
  • या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, तक्रार स्वतः माहिती अ धिकार कार्यकर्ता महासंघाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष श्री. ईश्वर घाळी यांनीच अधिकृतरित्या दाखल केली होती. त्यांच्या सतर्कतेमुळे ही भ्रष्टाचारविरोधी कारवाई शक्य झाली.
  • लाच मागणी आणि सापळा
  • तक्रारदाराने राज्य महामार्ग रुंदीकरणासाठी झाडांची लि लाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक टेंडर अर्ज सादर केला होता.
  • मात्र, संबंधित वनपाल यादव याने तो अर्ज पुढील प्रक्रिये साठी वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी तडजोडीनंतर ₹5000 लाच मागितली.
  • या मागणीची माहिती श्री.ईश्वर घाळी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात यादव लाच घेताना रंगेहात पकडला गेला.
  • कारवाईचं नेतृत्व व पथक
  • सदर कारवाई उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली.
  • तत्परतेने प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला आणि अधिकारी अजय चव्हाण, सुनील घोसाळक र, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे व प्रशांत दावणे यांनी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
  • गुन्हा दाखल आणि पुढील तपास
  • सागर यादव याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
  • ईश्वर घाळी यांचे काम कौतुकास्पद असून, नागरिकांनीही अशा भ्रष्ट वर्तनाचा विरोध करावा, असे आवाहन करण्या त येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles