
वसई-विरारच्या महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय — आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश; बस प्रवासात ५०% सवलत १ जूनपासून लागू
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- विरार | २३ एप्रिल २०२५ – वसई-विरार शहरातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आ णि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.
- महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास कर णाऱ्या महिलांना आता तिकीट दरात ५०% सवलत मिळ णार आहे.
- ही सवलत १ जून २०२५ पासून लागू करण्यात येणार अ सून, त्याबाबतचा अधिकृत निर्णय महानगरपालिका आयु क्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार (भा.प्र.से) यांनी जाहीर केला आहे.
- या निर्णयामागे वसई विधानसभा मतदारसंघाच्या दूरदृष्टी संपन्न, संघर्षशील व जनतेसाठी कटिबद्ध आमदार सौ. स्ने हा दुबे पंडित यांचा प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण पाठपुरा वा निर्णायक ठरला आहे.
- महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक सक्षमी करणासाठी त्यांनी वेळोवेळी शासन दरबारी ठोस भूमिका मांडली.
- त्या भूमिकेला राज्य शासनाने प्रतिसाद देत वसई-विरार शहरात सवलतीच्या प्रवास योजनेला मान्यता दिली आहे.
- हा निर्णय केवळ आर्थिक सवलतीचा नाही, तर महिलां च्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबनाचा निर्णायक टप्पा आहे.
- स्थानिक महिला, पालक आणि सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/