जहांगीर आर्ट गॅलरीत दि. २७ मे ते २ जून या कालावधीत शिरवलीतील आर्टिस्ट सुर्यकांत राजापकर यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे शिरवली गाव मोर्ये वाडीचे सुपुत्र सूर्यकांत नारायण राजप कर यांचे शिक्षण मुंबईला गोरेगाव इथे झाले SSC झाल्या वर त्यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्ट या कॉलेज मध्ये फाईन आर्ट या क्षेत्रात डिप्लोमा केला.
  • त्यानंतर डिप्लोमा आर्ट शिक्षण ही पदवी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या कॉलेज मध्ये घेतली. कॉलेज पूर्ण झाल्या नंतर १२ वर्ष ऍनिमेशन क्षेत्रात काम केलं.
  • तसेच ५ वर्ष drawing टीचर म्हणून काम केलं. कोरोना काळात स्वतःच पैंटिंग आणि म्युरल बनवायला सुरवात केली.
  • फायबर, सिपोरेक्स, स्टील वायर या वेगवेगळ्या माध्यमा तून म्यूरल तयार केली.
  •  Synthesia हे त्यांच्या आर्ट ग्रुपचं नाव असून या ग्रुप म ध्ये त्यांचे मित्र भूषण उदगीरकर, स्वाती भिडे, शलाका पा टील, करिष्मा सुर्वे – साळवी, रुपाली म्हात्रे, सूर्यकांत राजा पकर एकूण ६ कलाकार मिळून हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीला २७ मे ते २ जून २०२५ या तारखेपर्यंत भरवले आहे.
  • सर्व कलारसिक यांना सकाळी ११ ते सायं ७ वाजे पर्यंत हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रत्ये क कलाकारची पेंटिंग करायची वेगळी शैली सर्व कला रशिकांना पाहायला मिळणार आहे.
  • तसेच प्रत्येक कलाकार यांना भेट देऊन प्रदर्शनाचा आनंद घेता येईल. शिरवली हे गाव नवरत्नांची खाण असून या गावात शिक्षक, वकील,प्रशासकीय अधिकारी तसेच सामा जिक क्षेत्रात युवक मंडळ शिरवली संस्था अग्रेसर आहे.
  • आता सुर्यकांत राजापकर यांच्या रुपाने शिरवली गावचे नाव उज्ज्वल करणारा हिरा गवसला आहे सुर्यकांत राजा पकर यांच्या वर लांजासह रत्नागिरी जिल्ह्यातून शुभेच्छां चा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles