
देवाचे गोठणे येथील तळेवठार वाडी तर्फे कुटुंब आनंद मेळावा, श्री सत्यनारायण महापूजा व विविध कार्यक्रम.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे देवाचे गोठणे येथील तळेवठार वाडीच्या वतीने प्रतिव र्षाप्रमाणे यंदाही दि. ११ ते १४ मे २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.११
- रोजी स्वच्छता मोहीम, सोमवार दि. १२ मे रोजी स.१० ते १ चित्रकला निबंध स्पर्धा, दु. ३ ते ७ या वेळेत महिला व लहान मुलांसाठी क्रिडा स्पर्धा, रात्री ८ वा. लहान मुलांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, बक्षीस समारंभ रात्री ९ वा. मंगळवार दि. १३ मे रोजी स. ८ वा. शंकर मंदिर द र्शन,स. ९ ते १०.३० दिंडी सोहळा, दु.१२.३० ते २.३० श्री सत्यनारायण महापूजा, दु.३ ते ६ पर्यंत हळदीकुंकू समारं भ, सायं ५ ते ८ महाप्रसाद, रात्री ९ वा.डबलबारी भजन तसेच बुधवार दि. १४ मे २०२५ रोजी क्रिकेटचा महासंग्रा म रंगणार आहे.
- या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, आप्तेष्ट मित्रपरिवार यांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन तळेवठार प्रतिष्ठान देवाचे गोठणे तसेच महिला मंडळ मुंबई आणि ग्रामीण पदाधिकारी व कार्यक र्ते यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/