
मालेगाव येथे आरटीआय कार्यकर्त्याला अधिकाऱ्यानी शिवीगाळ केल्याने अखेर निलंबन.
- प्रतिनिधी : राजाराम खांगळ उर्फ आर के मामा :- मा हिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम १९(४) अन्वये प्रथम अपिल अर्जाची सुनावणी ठेवण्यात आली असता अपील सुनावणीच्या वेळी मालेगाव येथील महान गरपालिकेत सहाय्यक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधि काऱ्यांसमोर मनपाच्या अग्निशमन विभाग प्रमुखांनी अर्वा च्य भाषेत शिवीगाळ केल्याने व दुसरीकडे माहिती अधि कार संघटनेने या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिल्याने सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहू न अखेर विभागीय चौकशीकामी आस्थापना विभाग जा. क्र. १११० दि.१९/०६/२०२५ रोजीच्या पत्रांन्वये मालेगाव महानगरपालिका सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

- माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे ही एक गंभी र बाब आणि बेकायदेशीर कृत्य आहे. या कृत्यामुळे लोक शाही पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर परिणाम होतो.
- त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासह त्यांना धमक्या देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणे आ वश्यक आहे. अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते विठोबा ध्यानध्यान यांनी दिली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in










