अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोकण प्रांताचा अभ्यास वर्ग संपन्न.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- संगमेश्वर -अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोकण प्रांत अभ्यास वर्ग दिनांक 8 नोव्हें बर 2025ते 9नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये परमपू ज्य गोळवळकर गुरुजी स्मृति प्रतिष्ठान गोळवली तालुका संगमेश्वर येथे राष्ट्रीय कार्यकारणी सह सचिव सौ नेहा ताई जोशी व राष्ट्रीय कार्यकारी सदस्य तथा कोकण प्रांत पाल क श्री विजय सागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
  • सुरुवातीला चिपळूण तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश सावर्डेक र यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
  • दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून अभ्यास वर्गाला सुरु वात झाली परिवारातील सदस्य नातेवाईक विविध क्षेत्रांम ध्ये निधन पावलेल्या व्यक्तीना श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • अभ्यास वर्गाच्या पहिल्या दिवशी श्री.प्रकाश सावर्डेकर यांनी ग्राहक पंचायत स्थापना हक्क कर्तव्य जबाबदारी या विषयावर तर ग्राहक कायदा 1986 व 2019 यासंदर्भात श्री.चंद्रकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
  • कोकण प्रांत अध्यक्ष मानसिंग यादव यांनी पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. तर राष्ट्रीय कार्यकारी सहसचिव सौ नेहा ताई जोशी यांनी संघटनेची रचना व कार्यपद्धती या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
  • दुसऱ्या दिवशी कोकण प्रांत सचिव चंद्रकांत मांडवकर यांनी पंच परिवर्तन या विषयी मार्गदर्शन करताना कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण स्वदेशी,नागरिक कर्तव्ये या मुद्द्यांवर सखोल मागणी केले.
  • रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री सचिन मोरे यांनी स्वदेशी माझी जबाबदारी या विषयावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.
  • कोकण प्रांत पालक श्री विजयजी सागर यांनी कार्यकर्ता कसा असावा याविषयी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले कोक ण प्रांत संघटक राजेंद्र बनगर यांनी सोशल मीडियाचा वा पर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
  • सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुभाष पुराणिक रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य रचना भोईर पालघर जिल्हाध्यक्ष महे श कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले संगमेश्वर तालु काध्यक्ष श्री प्रविण जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
  • या अभ्यास वर्गाला पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंघूदुर्ग या जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
  • कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोकण प्रांताचे सहसचिव श्री विकास ढवण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली. शेवटी पसायदानाने अभ्यास वर्गाची सांगता झाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles