
संकल्पातून यशाचा मार्ग – प्रा.मानसिंग साळुंखे.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- जीवनामध्ये एखादे यश मिळवण्यासाठी आपण संकल्प केला. सातत्य ठेवले. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले तर आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.

- असे उद्गार प्राध्यापक मानसिंग साळुंखे यांनी काढले. मॉड र्न हायस्कूल यमुनानगर निगडी या प्रशालेतील गुणवंत वि द्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
- फेब्रुवारी २०२५शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी,इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत चमकलेले विद्यार्थी आणि NNMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.

- यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या समवे त गौरविण्यात आले.
- याप्रसंगी प्रशालेतील विविध परीक्षां ना मार्गदर्शन करणा ऱ्या गुणवंत शिक्षकांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
- कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी केले. निकालाचे विवरण पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी सांगितले.

- पाहुण्यांचा परिचय प्रशांत कुलकर्णी यांनी करून दिला. यादी वाचन उमर शेख यांनी केले. आभार गौरी देशपांडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन नवेश पाटील यांनी केले.
- याप्रसंगी शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा वंदना दोडके, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य राजीव कुटे उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे नियोजन शिवाजी अंबिके,मनीषा बोत्रे,कुसुम पाडळे यांनी केले.

- सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,सचिव प्रा.शा मकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, सुरे श तोडकर, उपसचिव प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, प्रमुख्याध्या पक प्रमोद शिंदे यांनी केले.कार्यक्रम उत्साहात पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











