
नारकर वाचनालय पाचल यांच्या तर्फे 28 सप्टेंबरला कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- पाचल येथील कै. ज्ञा.म.नारकर वाचनालया मार्फत रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 ते 5: 30 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
- या स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत. इयत्ता 5 वी ते 7 वी साठी क थाकथन स्पर्धा व इयत्ता 8 वी ते 10 वी साठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.

- वक्तृत्व स्पर्धेसाठी मला आवडलेले पुस्तक, पर्यावरण आ णि कचरा नियोजन, मोबाइल शाप की वरदान, मी कोण होणार? असे चार विषय देण्यात आले आहेत.
- ही स्पर्धा पाचल परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.
- या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रु.1000/-750/-500/- पुस्तक, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रु. 250/- पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
- शिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
- तसेच या दोन्ही स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यां ना एक वर्षासाठी वाचनालयाचे ‘मोफत’ सभासदत्व देण्यात येणार आहे.
- या स्पर्धा कै.गो.बा.ऊर्फ आबा नारकर सभागृह, ग्रामसचि वालय पाचल येथे होणार आहेत.
- तरी या स्पर्धांमध्ये पाचल परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्ती त जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अ ध्यक्ष किशोर ज्ञानदेव नारकर व कार्यवाह विनायक खान विलकर यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











