माहिती अधिकार द्वितीय अपील सुनावणी आता सर्वांसाठी खुली खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ उर्फ आर के मामा :- मा हिती अधिकार अधिनियमातील दाखल अपील सुनावणी आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा ऐतिहा सिक निर्णय राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठा ने घेतला आहे.
  • राज्य माहिती आयोगाच्या ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी झाले ल्या बैठकीत माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १५(४) नुसार खुल्या सुनावणीला मान्यता दिली होती.
  • त्यानुसार १६ जून २०२५ पासून कोकण खंडपीठात द्विती य अपिलांवर होणाऱ्या सुनावण्या सर्वसामान्यांसाठी खु ल्या केल्या असून त्याकरिता खुल्या सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी काही अटी शर्ती घालुन नियम करण्यात आले आहेत.
  • असे असतील ते नियम
  • १) प्रत्यक्ष सुनावणीत अपीलकर्ता, जन माहिती अधिका री, प्रथम अपिलीय अधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच सहभाग घेण्याची परवानगी असेल
  • २) सर्व उपस्थित आणि राज्य माहिती आयुक्तांचा सन्मान राखणे बंधनकारक असेल.
  • ३) मोबाईल बंद ठेवणे आवश्यक असून ध्वनिचित्रमुद्रण करता येणार नाही.
  • ४)त्रयस्थ व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई केली जाऊ शकते.
  • ५) इतर नागरिकांना केवळ अभ्यंगत म्हणून उपस्थित रा हता येईल. मात्र बोलण्यास किंवा प्रक्रिया हस्तक्षेप कर ण्यास परवानगी नसेल.
  • असे अटी शर्तीचे नियम सांगून १६ जून २०२५ पासून को कण खंडपीठात त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
  • त्यामुळे माहिती अधिकार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आण ण्यास मदत होईल असा विश्वास राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी कोकण खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय देतांना स्पष्ट सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles