
वाढदिवस साजरे करण्यावर बंदी घाला – दीपक पाचपुते यांची मागणी ; शासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कार्यक्रमांना आळा घालण्याचे निवेदन.
- प्रतिनिधी : अहमदनगर : दिपक पाचपुते :- ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूहा चे जिल्हाध्यक्ष दीपक पाचपुते (ता. टाकळी काझी) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत वाढदिवस व वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घालावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

- यासंदर्भात त्यांनी शासनाच्या सार्वजनिक तक्रार पोर्टलवर अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेत नागर तालु का पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तपास करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

- पाचपुते यांच्या निवेदनात म्हटले आहे की,”अनेक शासकी य कार्यालयांमध्ये वाढदिवस, केक कापणे, फुगे लावणे, मिठाई वाटणे, फोटोशूट इ. गोष्टी सर्रासपणे कार्यालयीन वेळेतच केल्या जातात.
- यामुळे शासकीय कामकाजात व्यत्यय येतो, तसेच कार्या लयीन शिस्त बिघडते.”

- त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम,1979 आणि शासकीय कामकाजाचे विनियमन निर्देश यांचे उदाहरण देत सांगितले की, शासकीय जागा, वेळ व संसाधने केवळ शासकीय कामासाठी वापरली पाहिजेत.
- वैयक्तिक कार्यक्रम हे कार्यालयीन शिस्तीला बाधा ठरतात.
- त्यांच्या मागणीनुसार :
- 1. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना स्पष्ट आदेश निर्गमित करावेत.
- 2. उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
- 3. कार्यालयांमध्ये सूचना फलक लावण्याचे आदेश द्यावेत.

- या निवेदनाची प्रत संबंधित प्रशासन विभाग व पोलीस वि भागांना पाठवण्यात आली असून, प्रशासनाने तत्काळ नि र्णय घ्यावा, अशी मागणी पाचपुते यांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









