
वाहतूक पोलिसांनी ई-चलान कारवाईदरम्यान खासगी मोबाईलचा वापर थांबवण्याचे स्पष्ट निर्देश.
- प्रतिनिधी : पालघर : अनंत पाटील :- वाहतूक विभागा तील पारदर्शकता आणि नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्ष ण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्ण य घेण्यात आला आहे.
- राज्यातील सर्व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी आणि अं मलदारांनी ई-चलान कारवाई करताना खासगी मोबाईल फोनचा वापर पूर्णपणे थांबवावा,असे स्पष्ट आदेश दि. ०३ जुलै २०२५ रोजी अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिले आहेत.

- हा निर्णय ०२ जुलै २०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथे मा. परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय वाहतूक आढावा बैठकीत घेण्यात आला.
- वाहतूक पोलीस अंमलदारांनी ई-चलान करताना कोणत्या ही परिस्थितीत त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर वाहन किंवा व्यक्तीचे फोटो/व्हिडिओ काढू नयेत.
- शासनाने अधिकृतपणे उपलब्ध करून दिलेल्या “रीअल टाइम मोबाईल चालान प्रणाली” चाच वापर करावा. ही प्रणाली अधिकृत असून यामार्फत संपूर्ण प्रक्रिया पारदर्श क आणि शिस्तबद्ध राहते.
- जर कोणी अधिकारी किंवा अंमलदार या आदेशांचे उल्लं घन करताना आढळले, तर त्यांच्या विरोधात प्रशासकीय शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- या निर्णयामुळे नागरिकांच्या गोपनीयतेचे अधिक चांगले संरक्षण होणार असून ई-चलान प्रक्रियेमध्ये विश्वासार्हता, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होणार आहे.

- वाहतूक विभागात हा बदल नागरिकाभिमुख, शिस्तबद्ध आणि तंत्रस्नेही प्रशासनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









