
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरची दि. २ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा तालुका राजापूरची वार्षिक सर्व साधारण सभा शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ६.३० वा. कुणबी ज्ञातीगृह,सेंट झेवियर्स स्ट्रीट,परेल मुंबई येथे शाखाध्यक्ष श्री शिवाजी ल.तेरवणकर यांच्या अध्यक्ष तेखाली आयोजित करण्यात आली आहे.

- सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृतांत वाचन करून मंजू र करणे,१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेरचा शाखेचा वार्षिक अहवाल वाचन व मंजूरी, दि.१ एप्रिल ते ३१ मार्च २०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक व उत्पन्न खर्च प त्रकास मंजूरी देणे, अंतर्गत हिशेब तपासणीसांच्या अहवा लाचे वाचन करून नोंद घेणे, सन २०२५ ते २६ सालाकरि ता अंतर्गत हिशेब तपासणीसांची नेमणूक करणे, मुलुंड विद्यार्थी वस्तीगृहाच्या प्रवेशाबाबत माहिती देणे.
- संस्थेच्या आजीव सभासद बाबत माहिती देणे, संघ संस्था पक कै. माळी गुरुजी अर्धपुतळ्याबाबत माहिती देणे, सन २०२६ दिनदर्शिका प्रकाशन बाबत माहिती देणे.
- अनेक विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे सदर सभेला सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन शाखा तालुका राजापूर स चिव श्री अनिल धों भोवड यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











