नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , Corona Virus: कोरोना झालेल्या पुरुषांचे टेन्शन वाढले; वीर्य, शुक्राणुंच्या संख्येवर एम्सचे संशोधन आले……. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

Corona Virus: कोरोना झालेल्या पुरुषांचे टेन्शन वाढले; वीर्य, शुक्राणुंच्या संख्येवर एम्सचे संशोधन आले…….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : DELHI: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगभरात धुमाकूळ माजविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कोरोना झालेल्या पुरुषांसाठी धक्कादायक माहिती आली आहे. ज्या पुरुषांना कोरोना झाला त्यांच्या वीर्यामध्ये घट झाल्याचे एका रिसर्चमध्ये समोर आले आहे.

 

हे संशोधन परदेशात झालेले नसून भारतातच झालेले आहे. एम्स पटना, दिल्ली आणि आंध्रप्रदेशच्या मंगलागरीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये कोरोनाने विर्याच्या शक्तीवर मोठा परिणाम केल्याचे समोर आले आहे.

ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ च्या काळात जे कोरोनाबाधित एम्स पटनामध्ये भरती झाले होते त्यांच्या वर हे संशोधन करण्यात आले आहे. यासाठी १९ ते ४२ वर्षांच्या ३० पुरुषांचे वीर्य तपासणीसाठी घेण्यात आले. त्यांचा स्पर्म काऊंट मोजण्यात आला.

कोरोनाची लागण असताना त्यांचे वीर्य पहिल्यांदा घेण्यात आले होते. त्याची स्पर्म काऊंट टेस्ट करण्यात आली होती. यानंतर अडीज महिन्यांनी पुन्हा या लोकांचे वीर्य घेण्यात आले. यामधील शुक्राणुंची संख्या कमालीची घटली होती.

वीर्यामध्ये शुक्राणू असतात. त्यातून गर्भधारणा होते. वीर्य तपासणीमध्ये शुक्राणुंची संख्या, आकार आणि त्यांचा वेग आदींचा विचार केला जातो. क्युरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की पहिल्या वीर्य नमुन्यात 30 पैकी 12 (40%) पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होती.

अडीच महिन्यांनंतरच्या चाचण्यांमध्ये 3 (10%) पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे दिसून आले. पहिल्या वीर्य नमुन्यात, 30 पैकी 10 सहभागींचे (33%) वीर्य 1.5 मिली पेक्षा कमी होते (जे प्रति संभोग 1.5 ते 5 मिली दरम्यान असावे लागते.).

सीड्स ऑफ इनोसेन्स आयव्हीएफ सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल म्हणाल्या की, कोविड-19 मुळे पुरुष प्रजनन क्षमता कमी होण्याबाबत जगभरात अभ्यास केले जात आहेत. या अभ्यासाचा डेटाबेसही तयार केला जात आहे. आयव्हीएफ करण्यापूर्वी रुग्णांच्या वीर्याचा दर्जा तपासण्याची शिफारस केली जाते.

डॉ सतीश पी दीपंकर यांनी ज्यांना कोरोना झाला आहे अशा पुरुषांच्या वीर्याचे मूल्यांकन करण्याचा सल्ला दिला आहे. वीर्य गुणवत्ता सामान्य होईपर्यंत हे संशोधन चालू ठेवावे, असे ते म्हणाले.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा