उत्तरेत थंडीची लाट………!
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : DELHI: श्रीनगर – उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून श्रीनगरमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे उणे 6.4 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नवी दिल्लीतही मोसमातील सर्वांत थंड रात्रीची नोंद झाली. दिल्लीत बुधवारी 2.2 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदविले गेले. हवामानशास्त्र विभागाने पुढील 24 तास तीव्र थंड आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये पुढील 24 तासांमध्ये थंड-कोरडे हवामान कायम राहण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे. या काळात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. दिल्लीतही लोधी रोड, आयानगर आणि रिज येथील हवामान केंद्रांवर अनुक्रमे 2.8 अंश सेल्सिअस, 2.2 अंश सेल्सिअस आणि 2.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. देशाच्या राजधानीत पहाटे 5.30 वाजता पालम येथे 25 मीटर आणि सफदरजंग येथे 50 मीटर इतक्या कमी दृश्यमानतेसह खूप दाट धुके दिसले. जम्मू-काश्मीरमधील तापमान पहलगाम- उणे 9.2 अंश सेल्सिअस गुलमर्ग- उणे 7.5 अंश सेल्सिअस कारगिल- उणे 19.2 अंश सेल्सिअस लेह- उणे 15.2 अंश सेल्सिअस सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space