राजापूर तालुक्यातील बागवेवाडी प्रीमियर लीग (BPL) मोठ्या उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे बागवेवाडी येथील बालमित्र मंडळ बागवेवाडी या मंड ळाच्या वतीने आयोजित केलेल्या २३ व्या बागवेवाडी प्री मिअर लीग (BPL) या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • या स्पर्धेत ‘लब बाईट सौंदळ’ या संघाने विजय मिळवला तर ‘नवलादेवी क्रिकेट संघ कोंडोशी’ संघ उपविजयी ठरला.
  • या स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. बा गवेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत स दस्य आणि अजिंक्यतारा बागवेवाडी क्रिकेट संघांचे माजी कर्णधार कै.गजानन राजाराम पांचाळ यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • या स्पर्धेत ऐकून १६ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाना कै.गजानन पांचाळ स्मृती चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
  • राजापूर तालुक्यात लौकिक पावलेले आणि गजानन पां चाळ यांच्या सानिध्यात खेळेलेले उत्कृष्ट माजी क्रिकेटपटू यांना या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
  • या स्पर्धेचे उदघाटन बागवेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री संजय रोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
  • याप्रसंगी ओशिवळे बागवेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच कु.नीलमताई हातणकर माजी उपसरपंच श्री.तुकाराम रो डे, सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय गांगण, श्री.दशरथ का मतेकर, प्रख्यात भजनी बुवा श्री धोंडू पांचाळ, श्री प्रकाश बावकर, श्री.संतोष कामतेकर, श्री योगेश हातणकर ,श्री संतोष आगटे, श्री संतोष पराडकर आदी ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती लाभली.
  • या स्पर्धेला प्रथम पारितोषिक पांचाळ परिवार व द्वितीय पारितोषिक श्री.संतोष कामतेकर (आकार क्लासेस) यां च्या तर्फे तसेच इतर पारितोषिके श्री.संभाजी व श्री.चंद्र कांत कुळये यांच्या कडून देण्यात आले.
  • या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उपसरपंच श्री.शिवरामजी कामतेकर , बागवेवाडी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष शेट्ये, सचिव श्री.विजय पांचाळ, श्री बळीराम कामतेकर, ग्रामसेवक श्री.मंगेश पांचाळ, पोस्ट मास्तर श्री.एकनाथ गांगण, श्री प्रमोद बोभाटे, बुवा श्री मोहन कामतेकर, श्री ज्ञानदेव कोरगावकर, श्री दीपक रोडे आदी बागवेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित राहिले.
  • या कार्यक्रमाला संबोधित करताना बालमित्र मंडळाचे अ ध्यक्ष श्री. कमलेश गांगण यांनी मंडळाची २३ वर्षाची कार कीर्द ही बागवेवाडीची क्रिकेटची परंपरा ग्रामस्थांच सह कार्य आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची मेहनत याच फलित आहे असे सांगितले.
  • तसेच मंडळाचे सचिव श्री.मनोज पांचाळ यांनी सर्व देण गीदारांचे व उपस्थित ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गांगण यांनी केले.
  • या स्पर्धेसाठी पंच म्हणून महेश पांचाळ, स्वप्नील शिरसाठ, प्रवीण पराडकर, प्रशांत कामतेकर, रवींद्र पांचाळ, दिलीप गांगण यांनी जबाबदारी पार पाडली.
  • सामन्याचे समालोचक म्हणून लांज्यातील दिनेश पांचाळ यांनी क्रीडा रसिकांचे उत्तम मनोरंजन केले.
  • ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सदस्य राजेंद्र आग टे, संतोष पांचाळ, प्रमोद आगटे, दिगंबर गांगण, सागर रो डे, मकरंद गांगण, तुषार पांचाळ, कैलास गांगण, किरण बोभाटे, अक्षय पांचाळ, मनोज बोभाटे, प्रयाग पांचाळ यां नी प्रचंड मेहनत घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles