नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मध्यप्रदेशमध्ये विमान कोसळून पायलट ठार, एक गंभीर जखमी, रीवा येथील घटना……… – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मध्यप्रदेशमध्ये विमान कोसळून पायलट ठार, एक गंभीर जखमी, रीवा येथील घटना………

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : delhi:ध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना (Plane Crash in Rewa) घडली. दुर्घटनाग्रस्त विमान मंदिराच्या घुमटावर आदळले आणि त्यानंतर कोसळले.                                                                    या घटनेत विमानात उपस्थित पायलट आणि प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातात बिहारमधील पाटणा येथील रहिवासी वरिष्ठ पायलट कॅप्टन विमल कुमार (Pilot Captain Vimal Kumar) यांचा मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते. तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होते. विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये (Plane Crash in Madhya Pradesh) भीतीचे वातावरण होते.                  प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी प्रशिक्षण कंपनीचे विमान मंदिराचा घुमट आणि विद्युत तारांना धडकले. ज्यामुळे पुढच्या काहीच क्षणात विमान अपघातग्रस्त झाले. ही घटना चौरहता पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावाच्या मंदिराजवळ घडली. जखमी पायलटला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.                                                                                             दाट धुके हे विमान अपघाताचे प्रमुख कारण ठरल्याची माहिती प्राथमी चौकशीत पुढे आली आहे. उमरी विमानतळावर प्लॅटून कंपनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असे. गुरुवारी रात्री 11.30 वाजता पायलट कॅप्टन विमल कुमार जयपूर येथील सोनू यादव या विद्यार्थ्याला प्रशिक्षण देत होते. टेक ऑफ केल्यानंतर विमान मंदिराच्या घुमटावर आदळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाचे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांनी घराबाहेर धाव घेतली आणि विमानाचे अवशेष त्यांना आढळून आले.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. ज्यामध्ये उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा पायलटचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.     सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा