
समाजसेवक राजेश मासवकर यांना ‘महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार’ प्रदान.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- स्वराज्य प्रतिष्ठान (र जि) पुरस्कृत हुतात्मा बाबू गेनू स्मारक समिती यांच्या वती ने रविवार दि. ८ जून २०२५ रोजी दादर येथे समाजसेवक राजेश मासवकर यांना “महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५” पद्मभूषण श्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

- यावेळी दै.मुंबई मित्र चे संपादक श्री. अभिजीतदादा राणे, श्री.प्रमोददादा (आप्पा)पाटील(अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान), नरवीर तानाजी मालुसरे यांच्या १३ व्या वंशज सौ.डॉ.शीत ल शिवराज मालुसरे, राजमाता जिजाऊ यांचे बंधू लाखो जी जाधवराव यांचे १४ वे वंशज श्री. संभाजीराव राजे जाधवराव, आदी मान्यवर उपस्थित होते.

- श्री.सुरज भाऊ भोईर यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अपार मेहनत घेतली.
- श्री.राजेश मासवकर हे गेली अनेक वर्षे शांताराम चॅरिटे बल ट्रस्टच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











