नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नाशिक तालुक्यातील १५ खाणपट्टा धारकांचे वाहतूक पास बंद, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी घेतला निर्णय. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

नाशिक तालुक्यातील १५ खाणपट्टा धारकांचे वाहतूक पास बंद, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी घेतला निर्णय.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजाराम खांगड : नाशिक तालुक्या तील सारूळ, राजूरबहुला आणि पिंपळद येथील १५ खाणपट्टाधारकांचे महाखनिज प्रणालीमध्ये ऑनलाइन सुरू असलेले वाहतूक पास (ईटीपी) बंद करण्याचा निर्णय अपर जिल्हा धिकारी बाबा साहेब पारधे यांनी घेतला आहे.
  • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने सारूळ, राजूरबहुला व पिंपळद या परिसरातील २१ खडी क्रशरवर कारवाई करत ते सील केले होते.
  • खडीक्रशरचालकांनी नियम पाळले नसल्याचा ठपका ठेवत परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन केल्याचे सांगत प्रशासनाचे सदर कारवाई केली होती.
  • या कारवाईविरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायाल यात दाद मागितली होती. त्यात न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश दिले होते.
  • त्यानुसार अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी सुनाव णी घेतली. मात्र त्यात त्यांनी खाणपट्टा आदेशा तील अटी व शर्ती ८, ९ व १४ चा भंग केल्याचे दिसून आले. खाणपट्ट्यात किती उत्खनन झाले, याची दैनंदिनी नोंदवही ठेवलेली नाही.
  • खाणपट्टा परिसरात सीमांकन केलेले नाही, डोंगर/टेकडी कटिंग करताना सहा मीटर नियमाचे पालन केलेले नाही. तसेच खाणपट्ट्याचे निष्पादन (करार नामा) करून घेतलेला नाही.
  • टेकड्यांचे शिखरे व उतार या ठिकाणावरून गौणख निजाचे उत्खनन करता येणार नाही, असे खाण पट्टा आदेशात अटी व शर्तीत असूनही टेकड्यांची शिखरे व उतारावर उत्खनन करण्यात आले आहे.
  • ज्याठिकाणी खाणपट्टा डोंगराळ भागात असेल तेथे डोंगररांगांचे उभे उत्ख नन करता येणार नाही, असे अटी-शर्तीत नमूद असूनही डोंगराळ भागातील डोंग ररांगांचे उभे उत्खनन करून गौणखनिज उत्खनन होत असल्याचे दिसून आले आहे.
  • या त्रुटींबाबत खाणपट्टाधारक यांना ३ जून २०२२ ला नोटीस देऊन सात दिवसांत खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली होती.
  • याबाबत खाणपट्टाधारक यांनी सादर केलेला लेखी खुलासा केवळ नकारा त्मक स्वरूपाचा असल्याने व आढळून आलेल्या त्रुटींबाबत कोणतीही समा धानकारक उत्तरे दिलेली नसल्याने अपर जिल्हा धिकारी पारधे यांनी १५ खानपट्ट्यांच्या उत्खननावर बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.
  • दरम्यान, पारधे यांच्या आदेशाविरोधात खाणपट्टा चालकांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली असल्याचे समजते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा