
मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- सोमवार दि.१६/०६/ २०२५ रोजी ‘ चला – शाळेत जाऊ या!’ शिक्षण आनंददा यी गुणवत्तापूर्ण.! शिक्षण…भाकरीचे…राष्ट्रीयत्वाचे…!! या महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या उपक्रमाअंतर्गत शाळे च्या प्रथमदिनी शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव व स्वाग तोत्सव आयोजित करण्यात आला होता.
- दरवर्षी जसं जून महिन्याची नवी सुरूवात होते तसं प्रत्ये क शाळेत उमलणाऱ्या चिमुकल्यांच्या हास्याने परिसर ग जबजून जातो आणि त्यासोबतच साजरा केला जातो शाळा प्रवेशोत्सव..!

- हा एक असा उत्सव आहे जो केवळ एका नवीन शैक्षणि क वर्षाची सुरूवात करत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरूवात अधोरेखित करतो..!
- म्हणूनच या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोक मतचे पत्रकार रामहरी केदारी हे उपस्थित होते.
- तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुप्रिया प वार,पालक संघाच्या उपाध्यक्षा शारदा हागे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा पूनम वाघ, सर्व पालक संघ व समित्यां चे सदस्य आणि मुख्याध्यापक पांडुरंग मराडे इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

- शासनाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मो फत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण उपस्थित सर्व मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले.
- सर्वप्रथम सनईच्या सुमधुर संगीताने व ढोल – ताशाच्या आवाजाने इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांचे औ क्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
- गुलाबपुष्प,पेन्सिल,शार्पनर, खोडरबर,बिस्किटे इत्यादी साहित्य देण्यात आले.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माळी यांनी केले. आप ल्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे यांनी शालेय जीवनात शिस्त किती महत्त्वाची असते या विषयी मार्गदर्शन केले.

- प्रमुख पाहुणे रामहरी केदारी यांनी मोबाईल हा विद्यार्थ्यां चा मित्र असतो की शत्रू या विषयी माहिती सांगून मोबाई लचा वापर कमी प्रमाणात करावा असे विचार व्यक्त केलेत.
- ज्येष्ठ शिक्षिका सुजाता कुलकर्णी यांनी’गप्पा गोष्टी करूया ‘ हे मनोरंजनात्मक गाणे सादर केले.
- संस्थेचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे,कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवे दिता एकबोटे,शाळा समितीचे अध्यक्ष मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणि क वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











