नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महापालिकेकडून अवघ्या आठ दिवसांतच बांधकाम परवाना दिला जात आहे. पण,त्यासाठी संबंधित कागदपत्र बंधनकारक. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महापालिकेकडून अवघ्या आठ दिवसांतच बांधकाम परवाना दिला जात आहे. पण,त्यासाठी संबंधित कागदपत्र बंधनकारक.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : योगेश सुळे :- मिळकतदारांची गरज पाहून आता महापालिकेकडून अवघ्या आठ दिवसां तच बांधकाम परवाना दिला जात आहे.
  • पण, त्यासाठी संबंधित जागेचा खरेदी दस्त, सात-बारा उतारा व सर्वात महत्त्वाचा मोजणी नकाशा आणि चालू कर भरल्याची पावती बंधनकारक आहे.
  • सोलापूर शहरातील अनेकांना प्रस्तावातील त्रुटीं मुळे बांधकाम परवाना लवकर मिळत नाही. तर काहीजण अपूर्ण कागदपत्रांसह महापालिकेकडे परवान्यासाठी प्रस्ताव देतात आणि परवानगी मिळ ण्यापूर्वीच बांधकामाला सुरवात करतात.
  • काहींनी तर बांधकामाला सुरवात केल्यावर किंवा बांधकाम पूर्ण झाल्यावर महापालिकेकडे परवानगी साठी अर्ज केल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत.
  • काहींनी तर अधिकार नसलेल्यांकडून परवानगी घेऊन बांधकामे केली आहेत. हा प्रकार काही दिव सांपूर्वी समोर आला असून,त्यातील दोषींवर आता योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
  • सध्या महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असले ल्या मिळकतीच्या सर्वेक्ष णात या बाबी समोर आल्या आहेत.
  • आतापर्यंत अडीच लाख मिळकतीं पैकी जवळपास दीड लाख मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून, त्यात अंदाजे सात हजारांपर्यंत लोकांनी अदला बदल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
  • ‘चिमणी’च्या परवानगीबाबत गुप्तता
  • श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत ९० मीटर चिमणी महापालि का प्रशासनाने १५ जून रोजी पाडली.
  • आता कारखान्याला आगामी गाळप हंगाम घेता यावा, यासाठी कारखान्याने नवीन ३० मीटर चिमणी बांधकामा साठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.
  • साधारण आठ दिवसांपूर्वी महापालिकेकडे त्यासंबं धीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भातील कार्यवाही कुठपर्यंत आली, कधी पर्यंत परवानगी मिळेल,याचे उत्तर अधिकारी माध्य मांना काहीही सांगायला तयार नाहीत.
  • पण, त्यासंबंधीची माहिती महापालिका आयुक्तांना दिली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगित ले. यासंदर्भात आयुक्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
  • गुंठेवारीचा सारा ‘बीपीएमएस’वर भरता येईल
  • शहर हद्दीतील बिगरशेती जमीन करण्यासाठीचा सारा भरण्यासाठी आता महसूल विभागाकडे हेलपाटे मारण्याची गरज नाही.
  • त्यासाठी काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाने निर्णय घेतला असून, त्या दृष्टीने काम सुरू झाले आहे.
  • ‘बीपीएमएस’ या अधिकृत पोर्टलवरून त्याची संपू र्ण कार्यवाही ऑनलाइन होणार आहे. पण,त्यासा ठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा