नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम; शासनाने निश्चित केलेल्या भारापेक्षा दुप्पट भार वाहतात विद्यार्थी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम; शासनाने निश्चित केलेल्या भारापेक्षा दुप्पट भार वाहतात विद्यार्थी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम आहे.
  • नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुपटी हून अधिक असल्याचे चित्र आहे. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना पाठीचे, मणक्याचे आजार जडत आहेत.
  • सरकारने विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी २०१५ मध्ये उपाययोजना जाहीर केल्या. काही शाळांनी विविध प्रयोग केले.
  • या वर्षी पाठ्यपुस्तकात कोरी पाने जोडून दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यां च्या पाठीवरचे ओझे कमी झाले का, याची पाहणी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये नियमितपणे झा ली नसल्याची माहिती समोर आली आहे.
  • शिक्षण विभागाने दप्तराचे वजन करण्याची जबाब दारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. याचा अहवा ल दरमहा शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
  • परंतु अधिकारी शांळामध्ये जाऊन पाहणी करण्या ऐवजी कागदोपत्री अहवा लावर समाधान मानत आहेत.
  • लहान वयात जड दप्तर वाहून नेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठीचे, मणक्याचे आजार जडत असल्याची माहि ती वैद्यकीय तपासणीतून पुढे आली आहे.
  • पाठीवरचे थोडे ओझे हातात…
  • दप्तरात वह्या,पुस्तके, कंपास,वर्कबुक या साहित्या सोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली असते. हे ओझे हलके करण्यासाठी मुलांना डबा आणि पाण्याची बाटली बास्केटमध्ये घेऊन येण्या चा आदेश काही शाळांनी दिला. यामुळे पाठीवरचे थोडे ओझे हातात आले आहे.
  • दप्तराचे वजन वाढविणारे साहित्य..
  • एकापेक्षा अधिक पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य, एकाच विषयाला एकापेक्षा जादा वह्या, प्रॅक्टिकलचे साहित्य, चित्रकला, कार्यानुभ व प्रोजेक्टचे साहित्य.
  • दप्तराच्या ओझ्यामुळे होणार परिणाम…
  • पाठीचा मणका आणि सांध्यावर परिणाम,पाठीच्या मणक्याचा आकार बदलणे, मणक्याच्या चकतीची झीज होणे, पाठ, मान, खांदेदुखीचा त्रास “आधी च्या दप्तराचे ओझे कमी झाले आहे.
  • मात्र आहे ते ओझेही विद्या र्थ्यांना झेपणारे नाही. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अजून उपाययोजना करायला हव्यात.”
  • – सरोज पाटील, निवृत्त मुख्याध्यापिका, कन्या विद्यालय, पिंपळगाव
  • दप्तराचे अपेक्षित आणि प्रत्यक्षात वजन
  • इयत्ता अपेक्षित वजन सध्याचे वजन
  • पहिली ते दुसरी १.५ किलो ४ ते ५ किलो
  • तिसरी ते पाचवी २.३ किलो ५ ते ७ किलो
  • सहावी ते सातवी ४ किलो ६ ते ८ किलो
  • आठवी ते नववी ४.५ किलो ७ ते ९ किलो
  • दहावी ५ किलो ७ ते १० किलो
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा