नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीयीकृत बँकांचे २० टक्केच पीककर्जवाटप; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राष्ट्रीयीकृत बँकांचे २० टक्केच पीककर्जवाटप; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- धुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शेती कर्जवाटपा साठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यंत निश्चांकी खरीप हंगाम पीककर्जवाटप झाले.
  • जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांवर अन्या य केला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे या प्रक्रि येकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसे ना (उबाठा)चे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केला आहे.
  • दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर शासन काय कारवाई करणार, असा सवालही माजी आमदार प्रा. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
  • आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, की यंदाचा खरीप हंगाम तीस३० टक्क्यांपेक्षा जास्त येणार नाही. कापूस, ज्वारी, मका, बाजरी ही प्रमुख पिके हातून गेलेली आहेत.
  • शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात जगणे जिकिरीचे होणार आहे. परतीचा चांग ला पाऊस न पडल्यास रब्बी हंगामही घेता येणार नाही, अशी स्थिती आहे. विहिरी, नाले, नद्या, तलाव अद्याप कोरडे पडले आहेत.
  • धुळे जिल्ह्यात पीकवाटपाचे यंदा ९४९ कोटी उद्दिष्ट होते. ते जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांना देण्यात आले होते.
  • मात्र ऑगस्ट संपत आला तरी धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता सर्वच बँकांनी पीककर्ज वाटपात अखडता हात घेतला आहे.
  • एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकूण कर्जवाटपा च्या जिल्ह्याच्या हिश्शात तीस टक्क्यांपेक्षा जास्त व दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १२२ टक्के कर्जवाटप केले आहे.
  • इतर बँकांनी फक्त १५ ते १८ टक्के कर्जवाटप केले आहे. उद्दिष्टापेक्षा ८० टक्के पीककर्जवाटप राष्ट्री यीकृत बँकांनी केले नाही, हे उपलब्ध आकडे वारीवरून सिद्ध होत आहे.
  • शिखर बँकेने मोठ्या प्रयासातून ऑगस्टच्या पहि ल्या आठवड्यात कर्ज दिले. त्या कर्जातील ७२ कोटी जुन्या कर्जात जमा करून घेतले.
  • उर्वरित २८ कोटींपैकी सर्व तरतुदी वगळता फक्त दोन कोटी धुळे-नंदुरबार जिल्ह्याला वाढीव कर्जवा टपासाठी उपलब्ध झाले.
  • शेतकऱ्यांची कर्ज मागणीची ओढ राष्ट्रीयीकृत बँकां कडे वाढली, मात्र राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतात हे दर वर्षीचे चित्र आहे.
  • धुळे जिल्ह्यात जुलैअखेर प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज :
  • बँक शेतकरी पीककर्ज मिळालेले शेतकरी
  • बँक ऑफ बडोदा ४,६४८ ३०२
  • बँक ऑफ इंडिया २,५१६ ९९८
  • बँक ऑफ महाराष्ट्र ८,७३७ १,३४६
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया १९,२६७ ६,९०६
  • इंडियन बँक ३१८ ६२
  • पंजाब नॅशनल बँक ९३७ २०
  • स्टेट बँक ऑफ इंडिया ३२,६२५ ५,५६०
  • युको बँक ३३६ ३१
  • युनियन बँक ऑफ इंडिया ५,३७३ ९६६
  • कॅनरा बँक २,१५७ ९७८
  • एचडीएफसी बँक ४,५६६ २८४
  • आयसीआयसीआय बँक ४,२३५ १,१८७
  • आयडीबीआय बँक १,८०८ ३८९
  • धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २०,६३५ २२०००+
  • अन्यथा ठेवी काढणार
  • दरम्यान,पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लीड बँकेचे व्यवस्थापक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करून राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई न केल्यास संबंधित बँकांच्या कार्यालयापुढे व जिल्हाधिकारी कार्यालया वर निदर्शने करून अशा बँकांतून शेतकरी व शेतक ऱ्यांच्या नातेवाइकांनी ठेवलेल्या ठेवी इतरत्र वळत्या कराव्यात.
  • यासाठी शिवसेना (उबाठा)च्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनाचा कार्यक्रम राबविण्यात येईल, असा इशाराही प्रा. पाटील यांनी दिला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा