नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अजित पवार यांची १० सप्‍टेंबरची उत्तरदायित्‍व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल : हसन मुश्रीफ – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

अजित पवार यांची १० सप्‍टेंबरची उत्तरदायित्‍व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल : हसन मुश्रीफ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : समाधान चव्हान : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १० सप्‍टेंबरची उत्तरदायित्‍व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल’, असा विश्‍‍वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला.
  • कोणत्याही सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी सभेचे आयोजन नसून, जिल्‍ह्या तील प्रलंबित प्रश्‍‍नांवर मार्ग काढणारी ही सभा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
  • सभेच्या तयारीसाठी बोलावलेल्या राष्‍ट्रवादी काँग्रे स पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेवून ही सभा यशस्‍वी करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
  • मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘अजित पवार यांना अडच णीत आणण्याचा प्रयत्‍न झाला. यावेळी आपल्या सह काही प्रमुख नेत्यांनी श्री. पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
  • या निर्णयाबाबत वेळोवेळी स्‍पष्‍ट माहिती देण्यात आली असून, आपल्या साठी हा विषय संपला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर श्री.पवार  पहिल्यां दाच जिल्‍हा दौऱ्या‍वर येत आहेत.
  • जिल्‍ह्यातील अनेक प्रश्‍‍नांची माहिती त्यांना आहे. थेट पाईपलाईनचा प्रश्‍‍न त्यांनीच मार्गी लावला. तसेच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उच्‍च न्यायालयाचे खंडपीठ असे काही प्रमुख विषय प्रलंबित आहेत.
  • हे विषय मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सभेचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • Kolhapur NCP Sabha Ajit Pawar
  • आमदार राजेश पाटील यांनीही उत्तरदायित्‍व सभेसाठी मतदारसंघात मेळावे आयोजित केल्याचे सांगितले. मोठ्या संख्येने जिल्‍ह्यातील जनता या मेळाव्याला उपस्‍थित राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
  • माजी आमदार के.पी.पाटील म्‍हणाले, ‘मी राष्ट्रवादी च्या अजित पवार गटासोबतच आहे. हसन -किसन ची जोडी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
  • राष्ट्रवादीचे काही कार्यक्रम घेण्यात आले, मात्र त्याचे निमंत्रण नसल्याने उपस्थित नव्हतो. अजित पवार यांना ताकद देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना अगोदर ताकद देणे आवश्यक आहे.’
  • आदिल फरास यांनीही मनोगत व्यक्‍त केले. बैठकी स जिल्‍हाध्यक्ष ए.वाय. पाटील, भैय्‍या माने, युवरा ज पाटील, मानसिंग गायकवाड, बाबासाहेब पाटी ल आसुर्लेकर आदी उपस्‍थित होते.
  • रॅली, गावागोवी फलकांनी स्‍वागत
  • अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यां दाच जिल्‍ह्यात जाहीर सभेसाठी येत आहेत. त्यामुळे शहरात त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहेत.
  • सर्वत्र स्‍वागत कमानी उभारल्या जाणार आहेत. ठि कठिकाणी बॅनर तसेच गावागावातही अशाच पध्‍द तीने बॅनर लावून जंगी स्‍वागत करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
  • मुंडेंच्या सभेसारखी परिस्‍थिती नको
  • सभेला येताना कार्यकर्ते आपली वाहने दूर लावता त आणि प्रमुखांची भाषणे झाली की लोक निघून जातात. धनंजय मुंडे यांच्या सभेत मुंडे यांचे भाष ण झाल्यानंतर लोक निघून गेले.
  • अशी परिस्‍थिती येणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना मुश्रीफ यांनी केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा