नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच, नागपूरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच, नागपूरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राहुल आढाऊ :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा शनिवारी दुपारी तीन वाजता सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम या मेळाव्याला प्रामुख्या ने उपस्थित राहणार आहेत.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार चाळीस आमदार घेऊन सत्तेस सहभागी झाल्यानंतर प्रथमच नागपूर जि ल्ह्यात मेळावा घेण्यात येत आहे.
  • राष्ट्रवादीच्यावतीने शहराध्यक्षपदी प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्षपदी बाबा गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात होणारी गर्दी आणि उपस्थिती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • विदर्भात राष्ट्रवादीला सक्रिय करण्याची जबाबदारी प्रफुल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नागपूरच्या मेळाव्यापासून अजित पवार गटाच्या कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे.
  • त्यानंतर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा