
जोगेश्वरीचा सुपुत्र लेफ्टनंट स्वराज सुरक्षा शशांक घोसाळकर याचा खासदार रविंद्र वायकर यांनी केला सत्कार.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- नॅशनल डिफेंस अकॅड मीच्या परीक्षेत संपूर्ण भारतात १४९ वा क्रमांक पटकावून जवळजवळ चार वर्षाच्या खडतर सैनिकी अधिकारी प्रशि क्षण पूर्ण झाल्यानंतर नुकतेच लेफ्टनंट या पदावर नियुक्त झालेल्या लेफ्टनंट स्वराज सुरक्षा शशांक घोसाळकर यां चा दिनांक – १८ जून रोजी पश्चिम उत्तर लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर आणि सौ मनिषा रविंद्र वायकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अभिनंदन करून पुढील काळात त्यांच्या हातून उत्तम देश सेवा घडून यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- २०२० मध्ये NDA च्या परीक्षेत संपूर्ण भारतात १४९ श्रे णी ( Rank ) वर उत्तीर्ण झालेल्या स्वराजचा कोरोना का ळात देखील वायकर यांनी विशेष सत्कार करून कौतुक केले होते आणि आज त्यांनी स्वराज लेफ्टनंट झाल्यावर विशेष सत्कार केला.

- त्याबरोबरच त्याला लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने घडविणाऱ्या आई सौ. सुरक्षा व वडिल शशांक घोसाळकर यांचादेखील वायकर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
- स्वराजचे कौतुक करताना रविंद्र वायकर यांनी त्याच्या आईवडिलांचे देखील कौतुक केले.
- आपल्या एकुलत्या एक मुलाला सैन्यात अधिकारी कर ण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आणि स्वप्न साकार केले त्याला तोड नाही.

- स्वराजचे भारतीय सैन्यात दाखल होऊन लेफ्टनंट झाल्या बद्दल संपूर्ण जोगेश्वरी, अंधेरी भागातील जनतेकडून कौतु काचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- या सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना सौ.सुरक्षा घोसा ळकर यांनी हा सत्कार म्हणजे मला माहेरच्या लोकांकडून केलेल्या कौतुका सारखा वाटतो असे म्हणाल्या.

- याप्रसंगी सौ.मनिषा रविंद्र वायकर, ज्ञानेश्वर सावंत, सौ. प्रियांका अंबोळकर आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











