नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रामकृष्णनगर येथे चोरट्याने घरफोडीत चक्क देव्हाऱ्यातून देवांची चोरी करून पसार झाला. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रामकृष्णनगर येथे चोरट्याने घरफोडीत चक्क देव्हाऱ्यातून देवांची चोरी करून पसार झाला.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : ईरफान शेख :- घरातील देव्हाऱ्यात पिढीजात असलेल्या देवांची पूजा करणाऱ्या एका कुटुंबाच्या घरातून त्यांचे देवच चोरीला गेल्यास त्यांच्या मनाची अवस्था काय होते, असे हे देवच जाणे.
  • अशीच परिस्थिती धंतोली पोलिस ठाणे परिसरा तील रामकृष्णनगर येथे राहणाऱ्या जोशी परिवारा वर ओढविली.
  • चोरट्याने केलेल्या घरफोडीत चक्क देव्हाऱ्यातून देवांची चोरी करून पसार झाला. मात्र, कुटुंबियां च्या देवाप्रती असलेल्या श्रद्धा बघून पोलिसांनी काही दिवसात चोरट्यास जेरबंद करीत, देवदुता प्रमाणे त्यांचे देव परत आणून दिले.
  • धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामकृष्णनगर येथे स्वप्नील मधुकर जोशी हे आयटी कंपनीत उच्चपदावर आहेत.
  • त्यांच्या कुटुंबाची देवावर श्रद्धा असल्याने कुटुंबात कोणताही कार्यक्रम असो, मात्र, घरच्या देवांसाठी त्यांची आई सतत घरीच राहायचा.
  • त्यातून अनेकदा त्यांची आई या बाहेरगावी नातेवाई कांकडेही जात नव्हत्या. मात्र, पुण्याला आपल्या मुलाकडे त्या गेल्या असताना त्यांच्या घरात २० जुलैला चोरट्याने शिरुन त्यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह देव्हाऱ्यातील देवपाटासह पितळ, चांदी आणि अष्टधातूने तयार केलेल्या देवांच्या मूर्तींचीही चोरी केली.
  • त्यामुळे त्यांची मनस्थितीच बिघडली. याबाबत त्यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ‘एक वेळ दागिने गेले तरी जाऊ द्या पण आमचे देव परत आणून द्या’ अशी विनवणी ते वांरवार पोलिसांकडे करीत होते.
  • त्यांची देवाप्रती असलेली श्रद्धा बघून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. चौधरी यांच्या पथकाने चोरट्याच्या शोधास सुरुवात केली.
  • काही दिवसातच किशन बने (वय २८) आणि प्रित म उर्फ उमाशंकर शर्मा या दोन आरोपींना अटक करीत, त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व देव आणि दागिने हस्तगत केले.
  • दरम्यान ही माहिती जोशी कुटुंबियांना मिळताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठून पोलिसांचे आभार मान त, देवदुतासारखे देव परत आणल्याबद्दल पोलिसां चे आभार मानले.
  • पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत, जोशी कुटुंबियांना त्यांचे देव परत केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा